राहुल महाजनच्या पत्नीने स्विकारला हिंदू धर्म

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्व राहुल महाजनने त्यांची पत्नी नताल्या इलिना महाजन ही रशियन असून, तिने हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे सांगितले आहे.

मुंबई  :  बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्व राहुल महाजनने त्यांची पत्नी नताल्या इलिना महाजन ही रशियन असून, तिने हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे सांगितले आहे. मी नेहमीच तिला सांगतो की पती-पत्नीचे नाते भगवान शिव आणि देवी पार्वतीसारखे असले पाहिजे. मी तिला गीता शिकवतो, आम्ही एकत्र बरेच पौराणिक गोष्टीदेखील वाचत असल्याचे राहुल महाजनने सांगितले आहे.

राहुल महाजन हा भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. राहुलने मी सिगारेट व दारू पूर्णपणे सोडली असून, सध्या स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी कामात व अध्यात्मात स्वत:ला व्यस्त ठेवत आहे, अशा आशयाची पोस्ट ट्विटरद्वारे शेअर केली होती.
 

संबंधित बातम्या