'सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरणार नाही'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

थलैवा रजनीकांत येत्या काही दिवसांत राजकिय पक्षाची घोषणा करणार असल्याच्या चर्चा होत्या, रजनीकांत यांनादेखील त्याला दुजोरा दिला होता, मात्र सध्या राजकारणापासून लांब राहणार असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलंय.

चेन्नई :  थलैवा रजनीकांत येत्या काही दिवसांत राजकिय पक्षाची घोषणा करणार असल्याच्या चर्चा होत्या, रजनीकांत यांनादेखील त्याला दुजोरा दिला होता, मात्र सध्या राजकारणापासून लांब राहणार असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले. 

मागील दोन वर्षांपासून निरनिराळ्या राजनैतिक मुद्यांमध्ये ६९ वर्षीय सुपरस्टार रजनी आपले मत मांडत आहेत. मात्र, त्यांचे चित्रपटसृष्टीतील सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांच्या राजकारणाला उशीर होत होता . कमल हसन यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते.  पण, काही काळ आपल्या प्रकृतीकडेच लक्ष देणार असल्याचं सांगत, येत्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये आपण सहभाग घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

यांना काल अपोलो रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उच्च रक्तदाबामुळे त्यांना २५ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. रजनीकांत यांची प्रकृती चांगली असून आता काळजी करण्यासारखे काहीही नाही, ब्लड प्रेशर आता नियंत्रणात असल्याची माहिती डॉक्टरांच्या टीमने दिली होती, मात्र त्यांनी काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या. 
 

संबंधित बातम्या