20 वर्षानंतर जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर दिसणार एकत्र? राम लखन भाग 2 ची चर्चा

20 वर्षानंतर जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर दिसणार एकत्र? राम लखन भाग 2 ची चर्चा
Will Ram Lakhan popular duo Jackie Shroff and Anil Kapoor reunite on the big screen after 20 years

राम लखनची लोकप्रिय जोडी जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासाठी अनिल कपूरने आपल्या सोशल हँडलवर विनोदी पद्धतीने चाहत्यांना हिंट दिली आहे. त्याने जॅकीसोबत एक फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. दोघांच्याही एकत्र काम करण्याची बातमी ऐकून त्यांचे चाहते खूप आनंदी
झाले आहेत.

अनिल कपूर आपल्या मजेशीर शैलीसाठी ओळखला जातो. तो सहसा त्यांच्या मित्रांसह आनंद शेअर करत राहतो. त्याने त्याचा सर्वात चांगला मित्र जॅकी श्रॉफबरोबर एक फोटो शेअर करुन असाच काहीसा आनंद व्यक्त केला आहे.

अनिल कपूरने @बिंदसभीडू मला सांगतो मी पुन्हा 17 -17 थप्पड मारणार आहे जसे मी परिंदा या चित्रपटात मारले होते. अनिलने आणखी एक फोटो शेअर केला आहे. 'मी @bindasbhidu ला म्हणतो: लवकरात लवकरच ... स्क्रिप्ट वर काम चालू आहे.  शा काहीश्या मजेदार कॅप्शनसोबत त्याने ही पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

राम लखन भाग 2 ची चर्चा आहे

अनिल कपूरने पोस्ट केलेल्या चित्रांमध्ये दोन्ही अभिनेते कुर्ता-पायजामा आणि गुलाबी पगडी घालून दिसत आहेत. हे पाहून लोक राम लखन भाग 2 च्या आगमनाबद्दल अंदाज बांधत आहेत. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. पण एवढ्या वर्षानंतरही या चित्रपटाची क्रेझ अजूनही लोकांमध्ये अनिल कपूर आणि जॅकी श्राफ च्या चाहत्यांमध्ये अबाधित आहे. या चित्रपटातील गाण्यांवर अजूनही लोकांचे पाय थिरकतात.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com