जॉन सिना उतरला संसाराच्या 'रिंग'मध्ये; फ्लोरिडात पार पडला विवाह सोहळा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

इतर कुणालाही कसला थांगपत्ता लागू न देता जॉनने उरकलेल्या लग्नामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या नव्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटींगचे फोटो व्हायरल झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

मुंबई -  WWEचा सुपरस्टार अशी ओळख असलेल्या जॉन सिनाचा विवाह सोहळा नुकताच फ्लोरिडातील तांपा याठिकाणी पार पडला. शाय शरियातझादे  असे त्याच्या पत्नीचे नाव असून  गेल्या काही दिवसांपासून सिना आणि शाय यांच्या अफेयरच्या बातम्या समोर येत होत्या. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसिध्दी माध्यमांपासून दूर एका ठिकाणी हा विवाह मोजक्याच उपस्थितांच्या हजेरीत पार पडला.
 इतर कुणालाही कसला थांगपत्ता लागू न देता जॉनने उरकलेल्या लग्नामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या नव्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटींगचे फोटो व्हायरल झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर ते दोघेही विवाहबंधनात अडकल्याने त्यासगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे. जॉन आणि शाय एकत्र फिरत असल्याचे व्हॅनकोअरमध्ये दिसून आले. कॅनडामध्ये एका चित्रिकरणामध्ये व्यस्त असताना त्यांची ओळख झाली होती. त्या दरम्यान ते रिलेशनशीपमध्य़े अडकल्याची चर्चा होती. 

  जॉनने लग्नाची बातमी आणि त्याविषयी कुणाला काही कळू याची काळजी घेतली होती. मात्र काही माध्यमांच्या हाती त्याच्या विवाहसोहळ्याचे फोटो लागले. त्यानंतर त्याची मोठी बातमी झाली. जॉन खरेच विवाहबंधनात अडकणार का, की ही अफवा आहे यावर चर्चा सुरु झाली. प्रत्यक्षात त्यांनी लग्न केले हे फार कमीजणांना माहिती आहे. काही खात्रीशीर माध्यमांच्या हाती त्याच्य़ा लग्नाची बातमी कळल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडिया़वर व्हायरल करण्यात आले आहे. त्याची पत्नी ही जन्माने इरानियन आहे. ती सध्या कॅनडेयिन देशाची नागरिक आहे. तर व्हॅनकोअर येथील एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते. 
 

जॉनचे यापूर्वी त्याची कॉलेजपासूनची मैत्रिण असणा-या एलिझाबेथशी 2009 मध्ये लग्न झाले होते. ते तीन वर्षे टिकले. यानंतर जॉन WWE मधल्या निक्की बेलाच्या प्रेमात पडला. सहा वर्षांपूर्वी त्यांचा ब्रेक अप झाला. यानंतर निक्कीने तिच्या एका डान्स पार्टनरशी लग्न केले.

संबंधित बातम्या