यामीने लग्नाच्या दिवशी आईच्या आठवणींना दिला उजाळा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 11 जून 2021

यामीच्या लग्नातील लुकला चांगलीच पसंती दिली,अशातच यामीच्या लग्नाबद्दलचा आणखीन एक राज समोर आला आहे. 

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने नुकतेच दिग्दर्शक आदित्य धर(Aditya Dhar ) याच्याशी लग्न केले आहे. यामी आणि आदित्यचे गुपचूप झालेलं लग्न सोशल मिडिया (Social media) वर प्रचंड वायरल झाले. 4 जून रोजी यामी आणि आदित्यने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. लग्नामध्ये (marriage) यामीच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले आहे. चाहत्यांना यामीच्या लग्नातील लुकला चांगलीच पसंती दिली,अशातच यामीच्या लग्नाबद्दलचा आणखीन एक राज समोर आला आहे. यामीने लग्नामध्ये अतिशय सिम्पल मेकअप (Makeup) केला होता, आणि त्यावर तिने सिल्कची साडी परिधान केली होती.यामीच्या लग्नाचा राज म्हणजे तिने लग्नात आई अंजलीची 33 वर्ष जुनी असलेली पारंपरिक साडी परिधान केली होती. सोशल मिडियातून माहितीनुसार, यामीने सिल्कच्या साडीवर आजीची ओढणी देखील घेतली होती.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

लग्नामधील यामीचा मेकअप कोणत्या मेकअप आर्टिस्टने नव्हे तर तिने स्वतःने केला होता, एवढेच नाही तर यामीची लग्नातील हेयर स्टाइल (hair style) तिची बहीण सुरीली गौतम हिने केली होती. यामीच्या चाहत्यांना तीचे हे सिक्रेट (secret) कळल्यानंतर ते देखील आश्यर्यचकित झाले. ज्या प्रमाणे लग्नात प्रत्येक जण लाखो रुपये खर्च करतात, पण यामीने अगदी कमी पैशात अतिशय सुंदर लग्न केले आहे, त्यामुळे तिचे हे सिक्रेट लग्न सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, यामुळे चाहत्यांचे यामीने मन देखील जिंकले आहे.       

सुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन 

यामीने लग्नातील वेगवेगळे फोटोस शेअर करायला सुरुवात केली आहे.यामीचे पारंपरिक फोटोज बघून चाहत्यांना तिचा हा लुक फारच आवडला आहे. यामीने एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीतून आपल्या करियरला सुरुवात केली होती. यामीने 'उरी' (Uri) या सिनेमातून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतले, यामीने हिंदी सिनेमांसह तामिळ आणि तेलगू या सिनेमांमध्येही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

संबंधित बातम्या