यशराज फिल्मने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी ठाकरे सरकारकडे मागितली परवानगी 

yashraj films
yashraj films

मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीचे काम लवकरात लवकर सुरू करता यावे यासाठी यशराज फिल्म्सने (Yashraj Films) महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार यशराज फिल्म्सचे सीएसआर विंग यशराज फाऊंडेशन मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या 30,000 कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरणाचा खर्च करण्यासाठी तयार आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया फिल्म अँड सिने एम्प्लॉईजने (FWEC) देखील मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राला चित्रपट उद्योगातील नियमित काम करणाऱ्या कामगारांविषयी कबुली दिली आहे. (Yashraj Films seeks permission from Thackeray government to vaccinate employees)

यश राज फिल्म्सने सुरुवातीच्या काळात संपूर्ण चित्रपटसृष्टीतील दैनंदिन कामगारांना लसीकरण देण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, या उपक्रमाला सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे पाहून आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया फिल्म अँड सिने एम्प्लॉईजने  देखील यावर जोर दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात यशराज फिल्म्सने त्यांच्या कामगारांना लसी देण्यासाठी कोरोनाचे 60 हजार डोस खरेदी करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली. यशराज फिल्मने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज  यांना एक पत्र लिहून ही माहिती दिली आहे. त्यानूसार चित्रपटसृष्टी अभूतपूर्व टप्प्यातून जात आहे. 

लवकरात लवकर हे पुन्हा सुरू करण्याची नितांत गरज आहे जेणेकरुन हजारो कामगार दररोज जीवन जगू शकतील आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतील. यश चोप्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून यासंदर्भात योग्य ते सहकार्य आणि पाठबळ देण्याची  यश राज फिल्म्सची इच्छा आहे. माहितीनूसार, कामगारांच्या संपूर्ण लसीकरणाचा खर्च यश राज फाऊंडेशन करेल. यामध्ये जनजागृती करणे, कामगारांना लसीकरणासाठी (Vaccination) आणणे-परत सोडणे, लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक चौकट तयार करणे या सर्व गोष्टी खर्चात समाविष्ट आहे. याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने देखील राज्य सरकारकडे फिल्म सिटी आणि मीरा भाईंदर भागात लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली होती.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com