ओ राशी, पावरी नंतर यशराज मुखातेचे नवीन रॅप होतंय तुफान व्हायरल; पहा video

ओ राशी, पावरी नंतर यशराज मुखातेचे नवीन रॅप होतंय तुफान व्हायरल; पहा video
yashraj mukhate

यशराज मुखाते आपल्या अनोख्या संगीत शैलीसाठी ओळखला जातो. एखादा संवाद त्याच्या संगीत आणि रॅपमध्ये इतका मिसळतो की त्याचा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतो. नुकताच यशराज मुखातेचा 'पावरी हो रही है' चा व्हिडिओ  डायलॉग बीट्सने खूप व्हायरल झाला. अशातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा व्हिडीओ समोर आला आहे. या नवीन व्हिडिओमध्ये ती महिला ‘एक्सक्युज मी..कमेंट करने वाले नो..याद रखना..मेरी जिंदगी है..कैसे भी जियूं..तुमसे मतलब” अशी बोलत आहे. (Yashraj mukhate's new rap get viral see video)

आतापर्यंत यशराज मुखातेच्या या  रॅपच्या  नवीन व्हिडिओला सोशल मीडियावर 9 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत, तर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यशराज व्हिडिओमध्ये रॅपिंग करतानाही दिसत आहे. काही लोकांना त्याच्या रॅप भाग खूप आवडला आहे. यशराजच्या या व्हिडिओवर भाष्य करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने  “आता तो पुलाव ब्रो ट्रेंड करेल'' अशा भाषेत प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने  “आता तो रिल्स वरती ट्रेंड करणार'' अशी भाषेत प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओतील त्या महिलेचे नाव स्मिता सातपुते आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

व्हिडिओ सोशिअल मीडियावरती टाकताना  यशराजने  "यम्मी यम्मी कोलैबोरेशन, और यह बस पुलाव है'' असे लिहिले आहे. यशराजने या अगोदर कोकिलाबेन रॅपद्वारे रात्रीतच प्रसिद्ध मिळवली होती. यानंतर त्याने शहनाज गिल यांच्या 'त्वाडा कुत्ता टॉमी' या डायलॉगला रॅप करून प्रसिद्धी मिळवली. इतकेच नाही तर बिग बॉस 14 मधील 'क्या ये सँडनी थी' नावाचा राखी सावंत यांचा संवादही खूप गाजला होता. यशराज नुकताच प्रसिद्ध संगीतकार गायक ए. आर. रहमान यांना भेटला होता. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com