नायरा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो सोडणार?

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

नायरा शोमध्ये मरणार आहे.  आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबई: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है.’ या मालिकेतील नायरा आणि कार्तिकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक आणि नायरा उर्फ ​​मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांचे चाहते सर्वात लोकप्रिय शो ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियल चा नविन प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांना धक्का बसले आहे.. व्हिडिओ रिलीज होताच चाहत्यांनी असा विचार केला की नायरा शोमध्ये मरणार आहे. 

आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. अलीकडे अशी अफवा पसरली आहे की नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने हा शो सोडणार आहे. अभिनेत्री किंवा निर्मात्यांनी अद्याप याची खातरजमा केली नसली तरी असे म्हणतात की येत्या आठवड्यात या शोमध्ये एक नवीन कास्ट दिसेल आणि बर्‍याच गोष्टी बदलतील. तथापि, ताज्या माहीतीनुसार असा दावा करण्यात आला आहे की कार्तिक आणि नायरा या टीव्हीवरील सर्वाधिक आवडत्या जोडीवर काहीही होणार नाही. ये रिश्ता क्या कहलाता है 3300 भाग पूर्ण करणार आहे.  नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली  आहे.

अलिकडेच शिवांगीने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शिवांगीने  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘मालिकेतील नायरा या पात्राचा मृत्यू नक्की होणार आहे. पण मी मालिकेतून एक्झिट घेणार हे चुकीचे आहे’ असे शिवांगी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, मालिकेत काय घडणार आहे हे येत्या १० दिवसांमध्ये सर्वांना कळेल. ‘सोशल मीडियावर नेहमीच अनेक अफवा पसरवल्या जात असतात. या अफवांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मालिकेमध्ये काय घडणार हे येत्या १० दिवसांमध्ये सर्वांना कळेल. मी मालिकेच्या प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांनी गेल्या २० वर्षांपासून जे आमच्यावर प्रेम केले ते कायम असू द्यावे.’

आणखी वाचा:

राम गोपाल वर्मांना महिलांच्या शरीरात रस बुद्धीत  नाही -

संबंधित बातम्या