Yo Yo Honey Singh ला शो दरम्यान अज्ञातांकडून धक्का बुक्की, FIR दाखल

चार ते पाच अज्ञात लोकांनी यो यो हनी सिंगवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Yo Yo Honey Singh News
Yo Yo Honey Singh NewsDainik Gomantak

दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये शो करण्यासाठी आलेला गायक यो यो हनी सिंगसोबत गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. 27 मार्च रोजी दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये गायक यो यो हनी सिंगवर (Yo Yo Honey Singh) कथित हल्ला करण्यात आल्यानंतर चार ते पाच अज्ञात लोकांच्या गटाविरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. (Yo Yo Honey Singh pushed by unknown during show FIR filed)

Yo Yo Honey Singh News
साऊथ सुपरस्टार यशने 'The Kashmir Files' आणि 'RRR' पाहिला नाही कारण...

यो यो हनी सिंग आणि त्याचे वकील इशान मुखर्जी यांनी 28 मार्च रोजी 'उपद्रव, गैरवर्तन आणि धमकावल्याची तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 27 मार्च रोजी स्कॉल क्लब, साउथ एक्स्टेंशन-2 येथे घडली आहे. एफआयआरनुसार, यो यो हनी सिंग 26 आणि 27 मार्चच्या मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला होता, त्यानंतर 27 मार्चच्या रात्री शो सुरू असताना चार-पाच जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्टेजवर चढून कलाकारांशी झटापट करायला सुरुवात केली. (Yo Yo Honey Singh News)

एफआयआरमध्ये म्हटले गेले की, “4-5 अज्ञात लोकांनी स्टेजवर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला. पूर्ण शोमध्ये त्याने बिअरच्या बाटल्या दाखवल्या आणि कलाकारांना धक्काबुक्की करून स्टेजवरून ढकलून दिले. त्यानंतर चेक शर्ट घातलेल्या एका माणसाने माझा (हनी सिंगचा) हात पकडला आणि त्याला पुढे ओढायला सुरुवात केली. मी ते टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो माणूस मला आव्हान देत होता आणि धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे एक शस्त्र असल्याचेही मी त्यावेळी पाहिले. लाल शर्ट घातलेला एक माणूस व्हिडिओ बनवत होता आणि म्हणत होता 'भगा दिया हनी सिंग को.'

Yo Yo Honey Singh News
Vedro Restaurant: गोव्यात सुझैन खानने सुरू केले नवे रेस्टॉरंट

हनी सिंगसह सर्व कलाकारांनी स्टेज रिकामा केला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हनी सिंगला मध्येच कार्यक्रम सोडावा लागला, असे तक्रारीत म्हटले गेले आहे. पोलिसांनी हेतुपुरस्सर दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणी अद्याप हनी सिंग किंवा त्याच्या वकिलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com