हे संमेलन होणार एप्रिलमध्‍ये

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

मराठी साहित्‍य संमेलन एप्रिलमध्‍ये
पेडणे येथे आयोजन : स्‍वागताध्‍यक्षपदी दयानंद सोपटे, कार्याध्‍यक्षपदी राजमोहन शेट्ये

अखिल गोवा मराठी साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आलेल्या समितीसोबत विनायक नाईक, कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये, चित्रा क्षीरसागर, सुहास बेळेकर व अन्‍य मान्‍यवर.

पेडणे : गोमंतक साहित्य सेवक मंडळाची महत्त्‍वपूर्ण बैठक येथील श्री भगवती हायस्कूलमध्ये होऊन यंदा अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात पेडणे येथे आयोजित करण्याचे निश्‍चित करण्‍यात आले. मंडळाचे ज्‍येष्ठ सदस्य विनायक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांची, तर कार्याध्यक्षपदी राजमोहन शेट्ये यांची एकमताने निवड झाली.

संमेलन कार्यकारिणी :
कार्यवाह : निवृत्ती शिरोडकर, चित्रा क्षीरसागर, भारत बागकर, प्रकाश धुमाळ, महादेव गवंडी, किशोर किनळेकर. खजिनदार - चंद्रकांत सांगळे, उपाध्यक्ष - उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, रमाकांत खलप, शंभू बांदेकर, संगिता परब, प्रकाश वेळीप परशुराम कोटकर, जितेंद्र देशप्रभू, राजेंद्र आर्लेकर, उत्तम कोटकर, गुरुदास सावळ.

सदस्य : प्रशांत मांद्रेकर, उमेश गाड, दत्ताराम मोपकर, जयवंत नाईक, सुभाष पार्सेकर, विठ्ठल पार्सेकर, सुहास बेळेकर, अमोल आसोलकर, जगन्नाथ पंडीत, प्रविण कोटकर, प्रकाश तळवणेकर, वसंत कोळंबकर, उदय गुरव, गोपीचंद आपुले, पुंडलीक पंडीत, महेश तिरोडकर, कौशल पेडणेकर, परशुराम नाईक, मनोहर गोवेकर, संजय गुरव प्रणव धुमाळ, विठ्ठल गावस, दयाराम पाडलोसकर, गुरुनाथ नाईक, राजेंद्र शेटगावकर,आनंद कोळंबकर, कृष्णा पालयेकर.

यंदाचे हे साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांनिशी करण्याचे ठरले. त्यासाठी विविध समित्यांची निवड केली जाणार असून त्यावर सर्वांना सामावून घेण्यात येणार आहे. संमेलनाला उद्‍घाटन म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना निमंत्रित करण्याचे ठरले. ज्‍येष्ठ सदस्य विनायक नाईक यांनी संमेलन हे तालुक्याच्या मुख्य ठिकाणी होण्याच्या केलेल्या सूचनेनुसार करण्याचे ठरले. प्रारंभी विनायक नाईक यांनी स्वागत केले. मंडळाचे कार्यवाह सुहास बेळेकर यांनी आभार मानले.

 

संबंधित बातम्या