मराठी साहित्य संमेलन

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पेडण्यातील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करा

रमेश वंसकर : २८व्या आयोजन समितीच्या बैठकीत आवाहन

अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर. सोबत विनायक नाईक, राजमोहन शेट्ये, सुहास बेळेकर, जयवंत नाईक व इतर.

पेडणे : पेडणे तालुका ही देवाची भूमी, साहित्यिकांची भूमी आहे. या भूमितील सर्वांना सामावून घेऊन २८वे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे साहित्य मराठी संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी पेडणे येथे केले.

श्री भगवती हायस्कूलमध्ये २८वे अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याविषयी आयोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत रमेश वंसकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विनायक नाईक, कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये, सुहास बेळेकर, जयवंत नाईक उपस्थित होते.

विनायक नाईक यांनी स्वागत करताना विविध समित्या निवडण्यामागील विचार मांडले. संमेलन स्थळ, निधी कसा उभारता येईल, मुख्यमंत्री निधीतून किती निधी उपलब्ध होईल यावर चर्चा करण्यात आली. शिवाय संमेलनाची स्मरणिका प्रसिद्ध करणे आणि त्याला पेडणेच्या मातीचा गंध असायला हवा, यावरही विचार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांमधून महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. त्यावर चर्चा करण्यात आली. यंदा २८वे अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्याचे निश्चित केले आहे.

यावेळी निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, प्रकाश तळवणेकर, उमेश गाड , विठोबा बगळी, सुबोध नाडकर्णी, दत्ताराम मोपकर, भगवान शेटकर, किशोर किनळेकर, गोपिचंद आपुले, दिलीप म्हामल आदींनी सूचना केल्या.

भाडे करार नाही म्हणून वीज बिल हि नाही

संबंधित बातम्या