पुण्यात हायप्रोफाइल जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 डिसेंबर 2017

पुणे : पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हायप्रोफाईल जुगार अडुयावर छापा टाकला. या कारवाईत बारामतीच्या पोलिस निरीक्षकासह 26 जणांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत पोकर नावाचा जुगार खेळताना चक्क पोलिस निरीक्षकच सापडल्यामुळे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

बारामती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव असे ताब्यात घेतलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अड्डा चालविणार्‍यांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. जुगार अड्डा चालविणारे दोघेही भागीदार फरार आहेत. यासंदर्भात 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर, अन्य सहाजण फरारी असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

मुंढवा परिसरात कपिला मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या इमारतीमध्ये वर्ल्ड स्पोर्ट ऑफ क्लब या नावाचा जुगाराचा अड्डा होता. त्यावेळी पोलिस निरीक्षकासह काही उच्चभ्रू मंडळी पोकर नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून साडेसहा लाखांची रोकड, चारचाकी आणि दुचाकी असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या सूचनेनुसार परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या