मडगावच्या नगरसेवकांचा विमानतळावर निषेध

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

तुकाराम गोवेकर
नावेली

तुकाराम गोवेकर
नावेली

मडगाव पालिकेचे सहा नगरसेवक माऊंट आबू येथे अभ्यास दौऱ्यावर गेले असून त्यांच्यासोबत पालिका मुख्यअभियंताही गेले आहेत. नगरसेवक मनोज मसूरकर, आर्थूर डिसिल्वा, केतन कुडतरकर, दामोदर नाईक, अविनाश शिरोडकर व डॉरीस टेक्‍सेरा तसेच पालिका अभियंता दिनिज डिमेलो यांचा समावेश आहे. नगराध्यक्षा पूजा नाईक यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
मंगळवारी हे नगरसेवक दाबोळी विमानतळावरून माऊंट आबू अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी रवाना झाले. अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांमध्ये मडगावचे आमदार दिगंबर कामत गटाचे चार तर भाजपाच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्याच्या मुद्यावरून पालिका मंडळाच्या बैठकीत गरमा गरम चर्चा झाली होती. त्याला दौऱ्यावर जाणाऱ्या नगरसेवकांनी अभ्यास दौरा रद्द करण्यास जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी कुणाला अभ्यास दौऱ्यावर जावेसे वाटते त्यांनी खुशाल जावे असे सांगितले होते.
दरम्यान, शॅडो कौन्सील फॉर मडगावच्यावतीने या अभ्यास दौऱ्याला सुरवातीपासूनच विरोध दर्शविला होता. मंगळवारी अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांना विरोध करण्यासाठी शॅडो कौन्सील फॉर मडगावचे निंमत्रक सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली राधा कवळेकर, आगुस्तीन गामा, रियाझ शेख, फेलीक्‍स डायस व रौफ शेख यांनी दाबोळी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ अभ्यास दौऱ्यावर जाणाऱ्या नगरसेवकांचा निषेध केला.

संबंधित बातम्या