शेअर बाजार तेजीत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शेअर बाजारात खरेदीला उधाण

सेन्सेक्‍समध्ये ३४९ अंश, तर निफ्टीत ९३ अंशांची वाढ

मुंबई : शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या सत्रात बुधवारी गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४९ अंशांची उसळी घेऊन ४१ हजार ५६५ अंशांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९३ अंशांनी वधारून १२ हजार २०१ अंशांवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमधून येणारा कच्चा माल आणि सुट्या भागांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.आता चीनमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोखीम घेत खरेदीला प्राधान्य दिले आहे.विशेषतः चीनमधून येणार कच्चा माल आणि सुटे भाग न आल्याने भारतातील अनेक उत्पादन प्रकल्पांवर परिणाम झाला आहे.जागतिक पातळीवर शांघाई, हॉंगकॉंगसह आशियातील इतर शेअर बाजार आणि युरोपीय शेअर बाजारांमध्ये आज सकारात्मक वातावरण होते.

हिंदुस्थान युनिलिव्हर तेजीत
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग सर्वाधिक पाच टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाला. याचबरोबर कोटक बॅंक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली.दुसरीकडे एसबीआय, इंड्‌सइंड बॅंक, सन फार्मा, अल्ट्राटेक आणि टायटन यांच्या समभागांमध्ये घसरण नोंदविण्यात आली.

 

 

 

संबंधित बातम्या