प्राथमिक शाळेतील बाजाराचा थाट

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

 विजयानंद शाळेत बाजार दिवस उत्साहात

 बाजार दिन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व खरेदी करताना पालक व ग्रामस्थ.

पणजी : तिखाजण मये येथील विजयानंद पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांसाठी बाजार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बाजार दिवसाचे उद्‍घाटन मये पंचायतीच्या सरपंच उर्वी मसुरकर ह्याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंच सीमा आरोंदेकर, विजयानंद ज्ञानप्रसारक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर, विजयानंद हायस्कुलाचे अध्यक्ष उदय पत्रे, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ माधुरी आमोणकर, खजिनदार नरेंद्र मयेकर व शिक्षक उपस्थित होते.

शाळेच्या आवारात बाजाराचे रुप देण्यात आले व मुलांना बाजार कसा भरतो ते दाखविण्यात आले. बाजार म्हणजे काय व कसा असतो, पैसे देऊन सामानाची खरेदी कशी केली जाते, पैशांची ओळख व पैशांची देवाण घेवाण, किती बील झाले, किती पैसे ग्राहकांने दिले तर किती पैसे परत करावे लागतात, हे सगळे मुलांना यावेळी शिकविण्यात आले.

यावेळी मयेच्या पंच सीमा आरोंदेकर हिने शाळेसाठी वाँटर प्युरीफायर दान केला. सूत्रसंचालन शिक्षिका अंकिता तारी यांनी केले. शिक्षिका विश्रांती आमोणकर यांनी आभार मानले.

 

 

 

 

 

पणजी करणार नाट्य महोत्सवात सादरीकरण

संबंधित बातम्या