मार्ना-शिवोलीत ग्रामस्थांची दांडी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मार्ना-शिवोली: शिवोलीनूतन मार्ना-शिवोलीची पहिलीच ग्रामसभा एकही विषय चर्चेस न येता अवघ्या दहा ते बारा ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली.शून्य अजेंड्यावर झालेली ही सभा ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय ठरली होती. ग्रामस्थांनी दांडी मारल्याने या ग्रामसभेतील हवाच निघून गेली.सरपंच सोनाली आगरवाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी वाचून दाखविला.अजेंड्यावर एकही विषय नसल्याचे सभेच्या निदर्शनास आणून दिले.

मार्ना-शिवोली: शिवोलीनूतन मार्ना-शिवोलीची पहिलीच ग्रामसभा एकही विषय चर्चेस न येता अवघ्या दहा ते बारा ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली.शून्य अजेंड्यावर झालेली ही सभा ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय ठरली होती. ग्रामस्थांनी दांडी मारल्याने या ग्रामसभेतील हवाच निघून गेली.सरपंच सोनाली आगरवाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी वाचून दाखविला.अजेंड्यावर एकही विषय नसल्याचे सभेच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी २०१९च्या मागील सभेत चर्चेस आलेल्या अनेक विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.व्यासपीठावर सरपंच शोनाली आगरवाडेकर, पंच सदस्यां शर्मीला वेर्णेकर, विलयम फर्नांडिस, विघ्नेश चोडणकर, फेर्मिना फर्नांडिस, सिल्वेस्टर फर्नांडिस, तसेच पंचायत सचीव सुभाष का़बळी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच सभेत पाठ फिरविल्याने पंचायत मंडळाकडून चिंता करण्यात आली. तथापि, यापुढे ग्रामविकास समीतीद्वारा सभेत चर्चेस आलेले विषय तसेच पंचायत मंडळाकडून घेण्यात आलेले ठराव मंजूर झाल्याशिवाय सरकारकडून त्यांची दखल घेतली जाणार नसल्याचे पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी ग्रामसभेला सूचित केले.स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे कांबळी यांनी आवाहन केले.
दरम्यान, स्थानिक जैव विविधता समितीला गावच्या लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत ग्रामस्थ ग्रेगरी डिसौझा यांनी व्यक्त केली.त्यामुळे परिसरातील जैवशक्ती तसेच वन्यप्राणी, नैसर्गिक साधनांची योग्य प्रमाणात माहिती उपलब्ध होत नसल्याचे उपस्थितांना सांगितले.परिसरातील शाळा-हायस्कूलात जैव विविधता विषयावर एक-दोन बैठका घेऊनही ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जैव विविधता संवर्धन समितीने ठराविक लोकांपुरतीच मर्यादित न राहता कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी पंचायत मंडळासमोर केली. गावातील भटक्या गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून, ग्रामस्थ तसेच वाहनचालकांसाठी मोठी समस्या बनून राहिली आहे.या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी कळंगुट पंचायतीच्या धर्तीवर परिसरातील खासगी गोशाळेशी करार करण्याचे ठरविल्याची माहिती यावेळी सरपंच शोनाली आगरवाडेकर यांनी दिली. या विषयीचा करार पूर्ण करण्यात आलेला असून, लवकरच पंचक्रोशीतील बेवारशी गुरांचा प्रश्न निकालात काढला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. गावातच गेली अनेक वर्षे स्वताच्या खाजगी जागेत सार्वजनिक गोशाळा चालविणारे अतुल सिरीन यांनी यावेळी ग्रामसभेला गोशाळे संबंधात सभेला माहिती करून दिली.

महापालिका व कार्निव्हल​
कचरा उचल प्रक्रियेत खंड
गावातील कचरा उचल प्रक्रियेत खंड पडत असल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून यावेळी स्पष्टीकरण मागितले. कचरा उचल प्रक्रियेत खंड पडल्यास पंचायत मंडळाला जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांकडून पंचायत मंडळाला देण्यात आला.

संबंधित बातम्या