पर्वरीत मास्कचे वितरण

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

कुटुंबातील प्रत्येकाला एक मुखावरण या पद्धतीने त्यांनी याचे वाटप केले.

पर्वरी 

पर्वरी येथील सरकारी वसाहत परिसरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुखावरणांचे (मास्क) घरोघरी जात वितरण केले. ही मुखावरणे कार्यकर्त्यांनी घऱीच शिवून तयार केली होती.

या उपक्रमात भाजपच्या मतदान केंद्र समितीचे अध्यक्ष किशन साळगावकर, भाजपच्या मंडळ समितीचे सरचिटणीस किशोर अस्नोडकर, दीपक नाईक, कानोबा नाईक, याजेश नाईक, नारायण चोडणकर, निषित वेर्लेकर आणि सिद्धेश नाईक सहभागी झाले. कुटुंबातील प्रत्येकाला एक मुखावरण या पद्धतीने त्यांनी याचे वाटप केले.

संबंधित बातम्या