मास्‍क आणायचे कोठून? महागड्या दराने होत आहे विक्री

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पणजी: राज्‍यात आजवर ‘कोरोना’ संशयितांची केवळ नोंद झाली, तरीही ‘कोरोना’ग्रस्‍त म्‍हणून एकही व्‍यक्‍ती सापडलेली नाही. तरीही देशभरासह राज्‍यातही भीती पसरली आहे. सावधगिरी म्‍हणून वापरले जाणारे मास्‍क, हँड सॅनिटायरझरची टंचाई निर्माण झाली आहे.

एरव्‍ही १० रुपयांना मिळणारा फेस मास्‍क आता ते ५० ते ७० रु.च्‍या दरात विकला जात आहे. काही ठिकाणी तर ते उपलब्‍धही नाहीत. हँड सॅनिटायझरची अवस्‍थाही अशीच आहे. ॲमेझॉन आणि फ्‍लिपकार्टवरही हे मास्‍क विकले गेले आहेत.

कोरोना प्रतिबंधक म्‍हणून ‘एन ९५’ नावाचा मास्‍क अतिशय प्रभावी समजला जातो. मात्र, या मास्‍कच्‍या किंमतीही गगनाला भिडल्‍या आहेत. औषधालयात हा मास्‍क खूप कमी ठिकाणी उपलब्‍ध आहे, याच्‍या किंमती २५ ते ३०० रु.च्‍या घरात आहेत. ऑनलाइन संकेतस्‍थळावर या मास्‍कच्‍या किंमती ७०० रु.च्‍या आसपास आहेत.

सरकारने सरकारी कार्यालयात मास्‍क आणि सॅनिटायझरची सक्‍ती केल्‍याचे सांगितले, तरी याबाबत कोणत्‍याही पातळीवर अंमलबजावणी झाल्‍याचे दिसून येत नाही. राज्‍यातील होलसेल विक्रेत्‍यांकडेही या प्रतिबंधात्‍मक वस्‍तू उपलब्‍ध नसल्‍याने औषधालयांची अवस्‍थाही अशीच आहे. सरकारला जर लोकांची काळजी असेल, तर त्‍यांनी आम्‍हाला मास्‍क उपलब्‍ध करून द्यायला हवे, अशा प्रतिक्रिया लोकांकडून व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत.

शाळांमध्‍ये विद्यार्थी येताहेत मास्‍क घालून

कोरोनाच्‍या प्रसाराबाबतच्‍या भीतीपोटी पालकही शाळांमध्‍ये आपल्‍या मुलांना मास्‍क घालून पाठवित आहेत. मास्‍क घालून येण्‍याबाबतची सक्‍ती कोणत्‍याही शाळेत करण्‍यात आली नसली, तरी केवळ खबरदारी म्‍हणून ही काळजी घेण्‍यात येत आहे.

चीनमधील कच्‍च्‍या मालापासून बनतात मास्‍क
चीनमधून येणाऱ्या कच्‍च्‍या मालापासून हे मास्‍क बनविले जातात. या मास्‍क तयार करणाऱ्या कंपन्‍या मुंबई, नागपूर आणि गुजरातमधील काही भागात आहेत. या कंपन्‍यांना मिळणारा मालच बंद झाल्‍याने त्‍या कंपन्‍या मास्‍क तयार करू शकत नाही.
 
संबंधित बातम्या