मटका व्‍यवसाय कायदेशीर करावा

Matka business should be legalized
Matka business should be legalized

कळंगुट: गोव्याच्या कानाकोपऱ्यात चोरीछुपे चाललेला मटका व्यवसाय कायद्याच्या बंधनात आणल्यास मोठ्या प्रमाणात चाललेला भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे सरकारला जीएसटी कर मिळण्याबरोबरच अनेकांच्या पोटापाण्याच्या प्रश्‍‍न सुटणार असल्याचे वक्तव्य कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे.

पर्रा येथे शनिवारी सकाळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात मंत्री लोबो बोलत होते. मटका व्यवसाय सगळीकडे चालतो, त्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असते. हा व्यवसाय कायद्याच्या चौकटीत आणल्यास त्यापासून सरकार तसेच जनतेचाही फायदा होऊ शकतो, असे मंत्री यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कसिनोमध्ये जुगार खेळण्यास स्थानिकांना बंदी घालण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला होता. सध्या त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे त्यांनी सांगितले. एखाद्या धनवान गोमंतकीयाची कसिनोमध्ये जुगार खेळायची इच्छा झाल्यास त्याला का अडवून धरावे, असा प्रतिप्रश्‍‍न मंत्री लोबो यांनी यावेळी केला. या निर्णयाचा पुनर्विचार होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कसिनो म्हणजे केवळ जुगारच नसून त्यामध्ये संगीताचाही नजराणा सामावलेला असतो. त्याशिवाय लहान मुला-मुलींसाठी वेगळा कक्ष त्यांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेला असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत कसिनोत प्रवेश करू इच्छिणाऱ्या गोमंतकीयांवर बंदी आणणे योग्य ठरणार नसल्याचे मंत्री लोबो यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com