नवा महापौर कोण याबद्दलच्या चर्चेला ऊत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:महापालिकेत उलट सुलट प्रतिक्रिया; नगरसेवकांत उत्सुकता
 पणजी महापौरपदी असलेल्या उदय मडकईकर यांची कारकीर्द येत्या मार्च महिन्यात संपणार आहे.त्यामुळे पुढील वर्ष-सव्वा वर्षासाठी महापौरपदी कोण बसणार, याविषयी सध्या महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे. जवळपास दोन महिन्यांचा अवधी बाकी असताना नवा महापौर कोण, याची उत्सुकता नगरसेवकांमध्ये सुरू आहे.

पणजी:महापालिकेत उलट सुलट प्रतिक्रिया; नगरसेवकांत उत्सुकता
 पणजी महापौरपदी असलेल्या उदय मडकईकर यांची कारकीर्द येत्या मार्च महिन्यात संपणार आहे.त्यामुळे पुढील वर्ष-सव्वा वर्षासाठी महापौरपदी कोण बसणार, याविषयी सध्या महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे. जवळपास दोन महिन्यांचा अवधी बाकी असताना नवा महापौर कोण, याची उत्सुकता नगरसेवकांमध्ये सुरू आहे.
सध्या महापालिकेतील एकूण ३० नगरसेवकांपैकी भाजपची सदस्यांची संख्या २६ झाली आहे. आमदार बाबूश मोन्सेरात भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे ही सदस्यसंख्या वाढली आहे.त्यामुळे विरोधी गटात केवळ चार नगरसेवक उरले आहेत.पूर्वाश्रमीचे भाजपचे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, पण अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नसल्याचे समजते.त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आणि त्यांची पत्नी आरती हळर्णकर हे अजूनही भाजपमध्ये आहेत.राहिला प्रश्‍न तो सुरेंद्र फुर्तादो आणि रूथ फुर्तादो या जोडीचा. पण आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याशी सुरेंद्र फुर्तादो यांचे चांगले संबंध राहिले आहेत.मोन्सेरात यांच्यामुळे त्यांना महापौरपद मिळाल्याची जान फुर्तादो यांना नक्कीच असणार आहे.
आमदार मोन्सेरात भाजपमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी फुर्तादो यांच्यानंतर विठ्ठल चोपडेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली होती.त्यांच्यानंतर विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेत मोन्सेरात यांनी उदय मडकईकर यांना या महापौरपदाच्या खुर्चीवर बसविले.आता मोन्सेरात हे भाजपमध्ये आल्याने त्यांचा शब्द प्रमाण राहणार की, पक्षाचा शब्द अंतिम राहणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.शिवाय याविषयी नगरसेवकांनाही याचे औत्सुक्य लागले आहे.पूर्वीच्या भाजपच्या गटातून दोन नगरसेवकांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे, पण आमदार भाजपवासी झाल्याने त्यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार की मोन्सेरात आपल्या मर्जीतील नगरसेवकाला हे पद देणार हे मार्चमध्ये समजून येईल.
दरम्यान, सध्याचे महापौर असलेल्या मडकईकर यांच्या कामावर मोन्सेरात खूष असतील तर त्यांनाच या पदावर ठेवण्यासाठी काही नगरसेवकांचा आग्रही असू शकतो,पण आमदार मोन्सेरात हे शेवटपर्यंत निर्णय जाहीर करीत नाहीत, हा अनुभव पाहता नव्या महापौरपदाच्या नियुक्तीच्या खेळीत मोन्सेरात नक्की कशी पावले टाकतात याकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा​
मोन्सेरात यांचा निर्णय महत्त्वाचा
आमदार मोन्सेरात यांच्या मर्जीतील नगरसेवकांची यादी पाहिली, तर त्यातील या पदासाठी केवळ तीन नावे समोर येतात, पण त्यातील एकाने केलेल्या एका कारनाम्यामुळे आमदार मोन्सेरात त्याच्यावर एवढी मर्जी दाखविणार नाही, हे सत्य आहे.उर्वरित दोन नावांत सध्याचे असलेले महापौर आणि महिला नगरसेविकेचा समावेश आहे.परंतु भाजपच्या गटातील मळ्यातील दोन नगरसेवकांची मोन्सेरात यांच्याशी फार जवळीक आहे. त्यामुळे पक्षाने जर या दोघांपैकी एकाचे नाव पुढे केले, तर मोन्सेरात यांना त्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागेल किंवा मोन्सेरातच या दोघांपैकी एकाचे नाव पुढे करू शकतात, अशी शक्यताही नाकारता येणार नाही.

संबंधित बातम्या