मेंदू-मणका विकार तपासणी व्हिजन हॉस्पिटलमध्ये 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:म्हापसा येथील व्हिजन हॉस्पिटलमधील ओपीडी ब्लॉकमध्ये रविवार ता. २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत मेंदू व मणक्यांच्या आजाराचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पणजी:म्हापसा येथील व्हिजन हॉस्पिटलमधील ओपीडी ब्लॉकमध्ये रविवार ता. २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत मेंदू व मणक्यांच्या आजाराचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दीनदयाळ स्वास्थ सेवा योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदू विकार उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरात भारतातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालय संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान विद्यापीठातून पदवीधर असलेले मेंदू विकार आणि नसांचे शल्य चिकित्सकतज्ञ डॉ अभिजित परब हे रूग्णांची तपासणी करतील. या शिबिरात मेंदूचे आजार, डोक्याला मार, रक्तस्त्राव, डोकेदुखी, फिट्स, चक्कर येणे, ब्रेन ट्युमर, मणक्यांचे आजार पाठदुखी, मणका सरकणे, मणक्यांच्या नसांच्या गाठींचा ट्युमर, हाता पायाला मुंग्या येणे, मानदुखी, चालताना झोक जाणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे अशा मेंदूशी व मणक्याशी निगडीत लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आहवान आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी (७७४४९९६६८८, ०८३२-२२६६७८८/१८८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व्हिजन हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.
 

 

 

 

कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

संबंधित बातम्या