वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्‍या

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदविकांचे रुपांतर आता पदवीत करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा १९ ने वाढवण्यात आल्या आहेत.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदविकांचे रुपांतर आता पदवीत करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा १९ ने वाढवण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो असे ते म्हणाले.
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने त्याविषयी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला पत्राने कळवले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सार्वजनिक आरोग्य पदविका, मानसशास्त्रीय उपचार पदविका, भूलशास्त्र पदविका, रेडिओ डायग्नोसीस पदविका, त्वचाविज्ञान पदविका, प्रसुतीशास्त्र पदविका, बाल आरोग्य पदविका हे पदविका अभ्यासक्रम आता पदवीत रुपांतरीत करण्यात आले आहेत. यामुळे या विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या पदवी अभ्यासक्रमांसाठी जागांची वाढ केल्याने १९ जास्त जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. २०२०-२१ शैक्षणिक वर्षापासून हा बदल लागू होणार आहे.

संबंधित बातम्या