आत्म्याचे परमात्म्याशी मंगल मिलन म्हणजे ध्यान

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कांपाल येथे प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या महाशिवरात्री महोत्सव व्याख्यानमालेत व्याख्यान देताना सरिता राठी.

कांपाल येथे ‘रिसिव्हींग गॉड्‍स पावर’ या विषयावरील व्याख्यानाला उपस्थित जनसमुदाय.

कांपाल-पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयातर्फे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त गेले सहा दिवस सुरू असलेल्या आध्यात्मिक विषयावरील व्याख्यानमालेत ‘रिसिव्हींग गॉड्‍स पावर’ या विषयावर सरिताबेहन यांनी मंगळवारी दुसरे पुष्प गुंफले.

पणजी : मनाच्या शक्तीला जागृत करणाऱ्या परमात्म्याला, दयेच्या सागराला प्रेमाने हाक मारलीत, त्याचे स्मरण केलेत तर त्याची कृपा बरसल्याशिवाय राहणार नाही. एकदा परमात्म्याशी नाते जोडले की कशाचीही चिंता करण्याची गरज उरणार नाही, तो नेहमीच तुमच्याबरोबर असेल याची जाणीव देऊन ब्रम्हकुमारी सरिता राणे यांनी आपल्या विचारांची काळजी घ्या, विचार पवित्र राखा.

कारण आत्म्याचे परमात्म्याशी मंगल मिलन म्हणजेच ध्यान आहे, असे सांगितले.
त्यांचे प्रबोधनात्मक सुरेख विवेचन ऐकण्यासाठी आजही आध्यात्मप्रेमींना गर्दी केली होती.
त्या म्हणाल्या, आपण रोज देवाची पूजा करताना हातांनी फुले वाहतो, डोळ्यांनी देवाचे दर्शन घेतो, तोंडाने मंत्र म्हणतो जप करतो आणि तासन तास पुजा करूनसुद्धा आपल विचार, वृत्ती बदलत नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, दुसऱ्यांना दुख देणे चालूच असते. कारण पूजा करताना आपले मन भलतीकडे भरकटत असते, भलते विचार मनात घोळत असतात.तेव्हा मनाची शक्ती जागृत करण्यासाठी आत्मारुपी पावर हाऊस (परमात्म्याकडे) जोडली पाहिजे.

परमात्म्याचे स्मरण करण्याचा ब्रह्ममुहूर्त पहाटेचा प्रहर असतो. पहाटे चार वाजता उठून एकाग्रतेने, प्रेमाने परमात्म्याचे स्मरण करा, त्या कल्याणकारी पित्याशी एकरुप व्हा म्हणजे तुम्हाला शांती लाभेल, तुमच्या मनाची कोंडी सुटेल, पुन्हा पुन्हा चिंताग्रस्त होणे, दुःखी कष्टी होणे, वैतागणे, तणावग्रस्त होणे यापासून मुक्ती मिळेल. कारण परमात्माच अशक्य गोष्ट शक्य करायला, कठीण ते सोपे करायला मदत करतो हे सरिता बेहन यांनी सोदाहरण स्पष्ट करून सांगितले.

ध्यान धारणेच्या सत्राने त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला. व्याख्यानमालेचे समन्वयक एकनाथ अंकलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  (२६) सरिता राठी यशाकरिता ‘आठ शक्ती’ या विषयावर संध्याकाळी ६.३० वाजता व्याख्यान देऊन व्याख्यान मालेची सांगता करतील.

काम, छंद कला म्हणजे ध्यान नव्हे...
आपले काम, छंद, कला म्हणजे ध्यान (मेडिटेशन नव्हे) हे सर्व तुमची आवड. परंतु आत्म्याचे परमात्म्याशी मंगल मिलन म्हणजेचे ध्यान होय, असे सांगताना सरिता राठी यांनी सांगितले की, परमात्म्याचे अस्तित्व आहे हे, दिल्ली ते पुणे मार्गावर रल्वेने त्या प्रवास करत असताना निर्माण झालेला बाका प्रसंग आणि ध्यानधारणेद्वारे त्या दरम्यान केलेले परमात्म्याचे स्मरण यामुळे त्या प्रसंगातून झालेली सुटका हा प्रसंग सांगून त्यांनी स्पष्ट केले.

आपण शुद्ध मनाने परमेश्‍वराचे स्मरण करतो तेव्हा आपण एकटे नसतो. मग आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावेळी विकृत विचारांचा माणूससुद्धा दानव रुपातून मानव रुपात अवतरतो याची सरिता बेहन यांनी जाणीव दिली

संबंधित बातम्या

फोटो फीचर