वाचनामुळे मानसिक, बौद्धिक विकास ः डॉ. संजय देसाई

Mental, intellectual development due to reading says Dr. Sanjay Desai
Mental, intellectual development due to reading says Dr. Sanjay Desai

आगोंदः बाह्य स्वच्छते बरोबरच प्रत्येकाने मासिके, वृत्तपत्रे, नियतकालिके व अन्य साहित्याचे वाचन केले तर मानसिक व बौद्धिक विकास होतो. त्यामधून जीवनात तेज निर्माण होऊन विकास कार्याला गती मिळते. आपल्या घराप्रमाणेच शाळा व आपला परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, असे विचार कुंकळ्ळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देसाई यांनी व्यक्त केले.

माशे, काणकोण येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात डॉ. देसाई प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी प्राचार्य जयराम गावकर, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, अनंतराव सावकार, ऊर्मिला लोलयेकर आदी उपस्थित होते.

आपण कोणत्याही गोष्टीकडे एकाग्रतेने, ध्येयाने कार्यरत राहिल्यास यश हमखास मिळते. देशातील पाच प्रेरणास्रोत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घटनांची यादी निराकार संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितली.

सत्यवती सोयरू उच्च माध्यमिक विद्यालयाने सुरवातीपासून आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगाने सुप्त कलागुणांना कसा वाव दिला आणि विद्यार्थी विकासासाठी केलेल्या कामगिरीचा आढावा सध्याचे कार्यकारी प्राचार्य जयराम गावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात घेतला. यावेळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी अपेक्षा नाडकर्णी व हर्षदा प्रभुदेसाई यांनी आपल्या अनुभवातून काही धाडसी आणि प्रेरणार्थक अशा आठवणी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राज्य पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षक कविंद्र फळदेसाई आणि सुधिर पै यांनी वार्षिक अहवाल दृक-श्राव्य माध्यमातून सादर केला. शिक्षक अँथनी बार्रेटो, गिरीजा पेडणेकर आणि अंकिता नाईक यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली. तर स्नेहर्ष पागी यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com