बेतोडा रस्त्याच्या मध्यभागी असलेले वीज केबल हटवा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

बेतोडा जंक्शन येथील वीज केबल हटवा  

आमदार रवी नाईक यांची मागणी; सरकार निर्णय घेणार असल्याचे वीजमंत्र्यांचे उत्तर

पणजी: बेतोडा जंक्शन येथे रस्त्याच्या मधोमध वीज केबल वर आले असल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे हे केबल काढण्यात यावेत, अशी मागणी फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी आज शून्य तासावेळी केली. ही समस्या राज्यातील इतर रस्त्यावरीलही आहे. त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेईल, असे उत्तर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिले.

बेतोडा जंक्शन येथे भूमिगत ३३ केव्हीए वीजवाहिनी गेली आहे. या वाहिनीची केबल रस्त्याच्या मधोमध काही ठिकाणी वर आल्याने ते धोकादायक ठरत आहे. अपघात होऊन जीव गमावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित खात्याने हे केबल तेथून काढावेत, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्याला उत्तर देताना वीजमंत्री काब्राल म्हणाले की, ३३ केव्हीए वीजवाहिनी ही जुनीच आहे व त्याची फक्त डागडुजी करण्यात येत आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करताना हे केबल रस्त्यामधून वर दिसतात. ही समस्या गोवाभर आहे. यावर तोडगा म्हणजे हे केबल बाजूला करणे आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य तो धोरणात्मक निर्णय घेतील.

 

 

 

 

 

 

 

चौथा आरोपीला अटक 

संबंधित बातम्या