गोव्यातील स्थानिक जनतेला रोजगार मिळण्यासाठी 'हे' व्हावे

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

खाण व्यवसाय पुन्हा सुरु होईल : धेंपो

भारतीय उद्योग महासंघाच्‍या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासोबत व्‍यासपीठावर महासंघाचे अध्‍यक्ष ललित सारस्‍वत, इंदोर स्‍मार्ट सिटी डेव्‍हलमेंटचे माजी मुख्‍य व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहन सक्‍सेना, सिमन्‍स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुनील माथुर आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

पणजी : भारतीय उद्योग महासंघ गोव्‍यातील स्‍थानिक जनतेला रोजगार मिळावा म्‍हणून झटत असतो. आम्‍हाला आशा आहे की राज्‍यातील खाण व्‍यवसाय पुन्‍हा सुरू होईल आणि राज्‍यातील जनतेला सलग काम करण्‍याची संधी मिळेल, असे मत भारतीय उद्योग महासंघाचे माजी अध्‍यक्ष आणि उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी व्‍यक्‍त केले.

महासंघ करीत असणाऱ्या प्रत्‍येक कामाचा उद्‍देश अतिशय चांगला आणि लोकोपयोगी असल्‍याने महासंघ नेहमीच सरकारसोबत संवाद साधत असल्‍याचेही यावेळी धेंपो म्‍हणाले.

इंदोरचे रूपांतर स्‍मार्ट सिटीमध्‍ये करण्‍याच्‍या हेतूने जेव्‍हा आम्‍ही वाटचाल सुरू केली तेव्‍हा याबाबतीत आव्‍हान लक्षात घेता आम्‍ही टप्‍प्‍याटप्‍प्‍यात काम करणे पसंत केले. तेथील कचरा असणाऱ्या ठिकाणांची यादी एकत्रित करून तेथील कचरा उचलण्‍यात आला आणि फलकांच्‍या माध्‍यमातून लोकांची जनजागृती करण्‍यास सुरुवात केल्‍याचे रोहन सक्‍सेना यांनी सांगितले.

घराघरातील कचरा एकत्रित करण्‍यासाठी गल्‍ल्‍यांमध्‍ये फिरणाऱ्या एकूण ६५० कचरा गोळा करणाऱ्या गाड्या सध्‍याही कार्यरत आहेत. येथे असणाऱ्या कचऱ्याच्या जागांचे रूपांतर आता आम्‍ही चांगल्‍या उद्यानात केले आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्‍याच्‍या सवयी वारंवार सांगून आणि यासाठीचे महत्त्‍व लोकांना पटवून देत ही सवय त्‍यांना लावण्‍यात आली आहे. जेणेकरून भविष्‍यातही अशा समस्‍या निर्माण होता कामा नयेत, असेही यावेळी सांगण्‍यात आले.

इंदोरला स्‍मार्ट सिटीमध्‍ये रूपांतरित करण्‍यासाठी आलेले सर्वात मोठे आव्‍हान म्‍हणजे लोकांच्‍या कचरा प्रश्‍‍नाबाबत जनजागृती करणे आणि त्‍यांना सवय लावण्‍याचे असल्‍याचे
त्‍यांनी सांगितले.

 

 

संबंधित बातम्या