राज्‍यातील खाणव्‍यवसायवर लवकरच तोडगा काढण्‍याची गरज, राज्‍यपाल

Dainik Gomantak
शनिवार, 18 जानेवारी 2020

पणजी, 
राज्‍यात खाणव्‍यवसाय बंद असल्‍याने सुमारे दीड लाख लोक बेरोजगारीला सामोरे जात आहेत. सुमारे २००० करोड रूपयांचा निधी खाणव्‍यवसायातून मिळत असे. राज्‍यात पर्यटन व्‍यवसायही चांगला चालत नाही. गोव्‍यातील लोकांनी या समस्‍येवर मुख्‍यमंत्र्‍यांच्‍या मदतीने तोडगा काढला असून मी गृहमंत्रींना भेटून त्‍यांना बोलावून या समस्‍येवर तोडगा काढण्‍यासाठी त्‍यांना बोलविण्‍यासाठीही बोललो असल्‍याची माहिती राज्‍यपाल सत्‍यपाल मलिक यांनी दिली. 

जायंट वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ४५ व्‍या जायंट इंटरनॅशनल कन्‍व्‍हेंशन बैठीकीचे प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर त्‍यांच्‍यासोबत संस्‍थेच्‍या जागतिक अध्‍यक्ष शायना एन. सी, कन्‍व्‍हेन्‍शनचे संयोजक शिरीष कपाडिआ, व्‍हिक्‍टर अल्‍बुकर्क, राजेश जोशी, संदीप नाडकर्नी, भालचंद्र आमोणकर आणि गणपत रायकर, प्रफुल्‍ल जोशी, आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. 
भांडवलशाहीची वैचारिकता ठेवणारा समाज कधीच टिकत नाही. त्‍यामुळे समाजात ज्‍यांच्‍याकडे अधिक पैसा आहे, जे लोक अधिक श्रीमंत आहेत त्‍यांनी इतरांना पैसे दान करण्‍यासाठी हात पुढे करायला हवा. अनेकलोक लग्‍नांमध्‍ये करोडो खर्च करतात, पण त्‍यांच्‍या मनात गरीबांनबद्‍दल कोणत्‍याच प्रकारची तळमळ नसेत, अशाप्रकारचे लोक मला निष्‍क्रीय असतात. इस्‍लाम धर्म एकुण कमाईच्‍या दहा टक्‍के रक्‍कम दान करण्‍याची शिकवण देतो आणि अनेक लोक अशी कृतीही करतात. असे लोक समाजात असतील तरच समाज पुढे जाईल, असेही राज्‍यपाल यावेळी म्‍हणाले. 
संस्‍थाच्‍या माध्‍यमातून होणार्‍या समाजकार्याला अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने समाजातही मान तसेच वाव मिळतो. लोकांच्‍या कल्‍याणासाठी जायंटसारख्‍या संस्‍था मनापासून काम करतात, त्‍यांचे योगदान महत्त्‍वाचे आहे. समाजाला एक चांगली दिशा मिळावी म्‍हणून या संस्‍था काम करीत असल्‍याने लोकांनीही या संस्‍थाचा हातभार लावण्‍यासाठी पुढे यायला हवे, असे मत शायना एन. सी यांनी व्‍यक्‍त केले. 
यावेळी राज्‍यपाल सत्‍यपाल मलिक यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी उपस्‍थितांच्‍या बैठका घेउन त्‍यांना वेगवेगळ्या पध्‍दतीने मार्गदर्शन करण्‍यात आले. हा उपक्रम संपुर्ण दिवस चालला. 

संबंधित बातम्या