तोतया मंत्र्यांला जामीन होऊनही हमीदाराअभावी कोठडीतच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:हमीदाराअभावी तोतया मंत्री न्यायालयीन कोठडीतच
उत्तरप्रदेशमधील तोतया मंत्री सुनील कुमार सिंग (४८) याला न्यायालयाने सशर्त जामीन दिला.मात्र, तो स्थानिक हमीदार सादर करू न शकल्याने त्याला न्यायालयीन कोठडीतच हवा खात बसावे लागले आहे.त्याच्या इतर चार साथीदारांनाही जामीन मिळाला आहे व त्यांनी एक स्थानिक हमीदार देऊन सुटका करून घेतली आहे.

गेल्या शनिवारी (१८ जानेवारी) न्यायालयाने संशयित सुनील सिंग याला ५० हजार रुपये वैयक्तिक जाचमुचलका तसेच तत्सम स्थानिक दोन हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन दिला आहे.न्यायालयात आरोपपत्र सादर होईपर्यंत पंधरवड्याने तपास अधिकाऱ्यासमोर हजेरी लावावी लागणार आहे.परंतु संशयिताला अजूनही दोन स्थानिक साक्षीदार मिळालेले नाहीत त्यामुळे त्याची पंचाईत झाली आहे.
तोतया मंत्री संशयित सिंग व त्याच्या इतर चारजणांनी गोव्यात नाताळ सणापूर्वी येऊन उत्तरप्रदेशचे मंत्री असल्याचे सांगून मोफत सरकारी पाहुणचार घेतला होता. सरकारनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून सरकारी शिष्टाचारनुसार देण्यात येणाऱ्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यांनी दहा दिवस सरकारी मोफत पाहुणचार घेतल्यानंतर एक दिवस मद्य घेऊन मसाज करण्यास गेला आणि त्याचे बिंग फुटले.त्याची व त्याच्यासोबत असलेल्या इतरांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत ते तोतया मंत्री असल्याचे उघड झाल्यावर अटक करण्यात आली होती

अधिकारी हात झटकण्याच्या तयारीत

संबंधित बातम्या