कर्मचाऱ्यांच्या पैशांचा सरकारकडून अनावश्यक वापर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कर्मचाऱ्यांच्या वेतन व कर्जाचे पैसे सरकारी वापरासाठी  

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : गोवा फॉरवर्डची मागणी

आर्थिक खात्याकडून कर्मचाऱ्यांच्या पैशांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी केली.

पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निवृत्तीवेतनापोटीची व सरकारच्या गृहकर्ज योजनेखाली वजा केलेली रक्कमेचा सरकारने वापर केला आहे. ही रक्कम सरकारने बँकांमध्ये वेळेत जमा केली नाही. ही रक्कम उशिरा जमा केल्याने व्याजाचा भुर्दंड सरकारकडून जाणूनबुजून केलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला आहे.

या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना प्रभुदेसाई म्हणाले की, सरकारकडून नव्या निवृत्तीवेतनापोटी वेतनामधून दरमहिना रक्कम कपात करून घेतली जाते. सरकारच्या गृहकर्ज योजनेखाली २ टक्क्यांने सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळते. निवृत्तीवेतनाचे व कर्जाचे हप्ते त्यांच्या वेतनातून दरमहिना वजा केले जातात मात्र ते वेळेवर बँकांमध्ये जमा केले जात नाहीत. ही रक्कम सरकारकडे ३ ते ६ महिने पडून त्याचा वापर सरकारी कामांसाठी केला जातो. त्यामुळे या रक्कमेवरील व्याज कर्मचाऱ्यांना मिळत नाही. हे व्याज सरकार भरणार काय? असा सवाल प्रभुदेसाई यांनी केला.

गृहकर्ज योजनेखाली २ टक्के दराने कर्ज देण्यात येते मात्र कर्जाचे हप्ते कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजा करून सरकार ते वेळेवर बँकेत जमा करत नसल्याने त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत आहे. कमी व्याज दराने कर्ज देण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होण्याऐवजी त्याचा भुर्दंडच सहन करावा लागत आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या रक्कमेचा वापर केल्याप्रकरणी त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या रक्कमेचा नकळत जाणूनबुजून वापर केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांची माफी मागावी. यासंदर्भातचे पुरावे पक्षाकडे आहेत, असे ते म्हणाले.

 

 

गोव्यातील सनदी अधिकाऱ्यांची बदली

संबंधित बातम्या