व्हिडिओद्वारे आमदार आलेमाव यांना धमकी

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

चर्चिल यानी गुरुवारी रात्री हा व्हिडिओ बघितल्यावर स्वतःच रात्री उशिरा कोलवा पोलीस स्थानकावर जाऊन तक्रार नोंद केली.

सासष्टी

बाणावलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी संशयित क्लेटस पाशेको (कोलवा) याला अटक करून उशिरा जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. 

कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित क्लेटस याने एक व्हिडिओ बनविला होता तर  त्यामध्ये त्याने चर्चिल आणि त्याच्या परिवाराला अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. चर्चिल यानी गुरुवारी रात्री हा व्हिडिओ बघितल्यावर स्वतःच रात्री उशिरा कोलवा पोलीस स्थानकावर जाऊन तक्रार नोंद केली. नंतर पोलिसांनी शुक्रवारी त्वरित कारवाई करून सकाळी संशयिताला अटक करून गुन्हा नोंद केला. पण, संध्याकाळी उशिरा जमिनीवर त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे

संबंधित बातम्या