देशभरात गेल्‍या दहा वर्षात वाघांच्‍या ५०३ पेक्षा अधिक हत्‍या.

Dainik Gomantak
सोमवार, 13 जानेवारी 2020

तेजश्री कुंभार, 
पणजी,

तेजश्री कुंभार, 
पणजी,

नवीन वर्षाच्‍या सुरवातीलाच राज्‍यात झालेल्‍या हत्‍यांबाबतचे पडसाद आता देशपातळीवर उमटत आहेत. देशपातळीवर असणार्‍या अनेक संस्‍था वन्‍यजीवांबद्‍दल आणि पर्यावरणाबद्‍दल जनजागृती व्‍हावी म्‍हणून मागणी करताना दिसून येत आहेत. याच पाश्‍‍वर्भुमीवर द वाइल्‍डलाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया (डब्‍ल्‍युपीएसआय) या संस्‍थेने वाघांच्‍या हत्‍येबाबतचा धक्‍कादायक खुलासा केला आहे. डब्‍ल्‍युपीएसआयच्‍या आकडेवारीनुसार २००९ पासून २०१९ पर्यंत देशपातळीवर ५०३ वाघ मारले गेले आहेत. हि माहिती केवळ नोंदणीकृत हत्‍यांची असून अज्ञात हत्‍यांचे प्रमाण अधिक आहे. गोव्‍यात घडलेल्‍या घटनेचा निषेध नोंदवत या संस्‍थेने जनजागृती आता काळाची गरज झाली असल्‍याचे म्‍हणणेही व्‍यक्‍त केले आहे. 
हि आकडेवारी संस्‍थेला मिळालेल्‍या आणि संस्‍थेने केलेल्‍या सर्वेक्षणाची असून अनेक वाघ मारून पुरलेले असू शकतात, किंवा हत्‍येचा मागोवा लागू न दिलेलाही असू शकतो. अशा वाघांची संख्‍याही मोठी असू शकते. वाघांना मारण्‍याची विविध कारणे समोर येतात, मात्र यातील बरेचसे वाघ शिकारीहेतूने मारण्‍यात आले आहेत.  
पर्यावरणाचे अभ्‍यासक चरण देसाई यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार गोवा सरकारने जंगलाच्‍या आसपास राहणार्‍या लोकांचे पुर्नवसन केले तर उत्तच आहे पण त्‍यांना काम मिळावे, यासाठी प्रयत्‍न करायला हवा. आता समाजाने आणि सरकारने दीर्घकालीन विचार करून अधिकाधिक जनजागृतीसाठी प्रयत्‍न करायला हवेत.  

पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर, यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २००९ साली गोव्‍यात एका वाघाची हत्‍या झाल्‍याचे समोर आले होते. त्‍यानंतर अशा हत्‍या उघडकीस आल्‍या नसल्‍या तरी लपूनछपून या हत्‍या नक्‍कीच होतात. जंगलाच्‍या आसपास राहणार्‍या लोकांचे पुर्नवसन हा या समस्‍येवरील चांगला उपाय आहे. सध्‍या गोव्‍यात ५ च्‍या सुमारास वाघ असून शकतात, ज्‍यांचे वाचणे पर्यावरणासाठी अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे. 

तक्‍ता करणे 
साल      वाघांचे मृत्‍यू 
२००९       ३२
२०१०       ३०
२०११       १३
२०१२       ३२
२०१३       ४३
२०१४       २३
२०१५       २६
२०१६       ५०
२०१७       ३८
२०१८       १०४
२०१९       ११२
एकुण         ५०३ 

संबंधित बातम्या