महापालिकेतर्फे दुकान गाळ्यांचे सर्वेक्षण सुरू

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

महापालिकेच्या मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दुकानदारांचा व्यवसाय परवाना शुल्कवाढ केली होती. ती शुल्कवाढ सरसकट होऊ नये, त्यासाठी ही दुकानांची मोजणी व्हावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती.

पणजी,

शहरातील दुकानमालकांकडून त्यांच्या क्षेत्रफळानुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यासाठी निरीक्षकांकडून मोजमाप सुरू झालेले आहे.
महापालिकेच्या मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दुकानदारांचा व्यवसाय परवाना शुल्कवाढ केली होती. ती शुल्कवाढ सरसकट होऊ नये, त्यासाठी ही दुकानांची मोजणी व्हावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे टाळेबंदीमुळे हे काम महापालिकेला तत्काळ सुरू करता आले नव्हते. टाळेबंदी शिथिल झाल्याने काही प्रमाणात दुकाने उघडी झाली आहेत. त्यामुळे दुकानांचे क्षेत्रफळ मोजता येणे शक्य झाल्याने महापालिकेच्या निरीक्षकांचे पथक सकाळपासून शहरातील उघड्या असलेल्या दुकानांचे क्षेत्रफळ मोजत आहेत.
महापालिकेने मागील सर्वसाधारण सभेत ज्या दुकानाचे ४० मीटरच्यावर क्षेत्रफळ आहे त्यांच्यासाठी ८ हजाराहून दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहे. त्यानंतर १०० चौ. मी. त्यापेक्षा अधिक चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या दुकानांसाठी वेगवेगळी रक्कम आकारण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी अगोदर दुकानांच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. वाढीव करानुसार महापालिकेला काही लाखांचा महसूल मिळणार आहे. त्यातूनच परवाना शुल्कवाढ करण्यात आली आहे.

 

 

संबंधित बातम्या