मुंबई-गोवा महामार्गाचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे का?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:मुंबई गोवा - कारवार महामार्गाचे काम सध्‍या युद्धपातळीवर सुरू आहे.कंत्राटदाराकडून काम लवकरात लवकर होण्‍याच्‍या प्रयत्‍नात नियमांची पायमल्ली होत आहे.एका बाजूने वाहनांची वर्दळ, दुसऱ्या बाजूने महामार्गाचे काम, तसेच बांधकाम साहित्‍य वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ या प्रयत्‍नात वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण ठरत आहे.लोकांचा जीव धोक्‍यात घालून पत्रादेवीपासून काणकोणपर्यंत काम सुरू आहे.सरकारनेही त्‍यांच्‍यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍‍यक आहे.महामार्गाचा आराखडा बनविताना संबंधितांनी ग्रामस्थांना गृहीत धरले आहे.त्‍यामुळे प्रत्‍यक्षात काम सुरू झाल्‍यावर त्‍यातील त्रुटी लक्षात येत आहेत.अ

पणजी:मुंबई गोवा - कारवार महामार्गाचे काम सध्‍या युद्धपातळीवर सुरू आहे.कंत्राटदाराकडून काम लवकरात लवकर होण्‍याच्‍या प्रयत्‍नात नियमांची पायमल्ली होत आहे.एका बाजूने वाहनांची वर्दळ, दुसऱ्या बाजूने महामार्गाचे काम, तसेच बांधकाम साहित्‍य वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ या प्रयत्‍नात वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण ठरत आहे.लोकांचा जीव धोक्‍यात घालून पत्रादेवीपासून काणकोणपर्यंत काम सुरू आहे.सरकारनेही त्‍यांच्‍यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍‍यक आहे.महामार्गाचा आराखडा बनविताना संबंधितांनी ग्रामस्थांना गृहीत धरले आहे.त्‍यामुळे प्रत्‍यक्षात काम सुरू झाल्‍यावर त्‍यातील त्रुटी लक्षात येत आहेत.अजूनही सरकारने मध्‍यस्‍थी करून याबाबत केंद्राला फेरविचार करण्‍यास भाग पाडले पाहिजे.मुंबई गोवा महामार्गाचे काम केंद्रीय महामार्ग प्राधिकरण महामंडळ यांच्‍यामार्फत सुरू आहे. केंद्राकडून महामार्गाचा आराखडा बनविताना स्‍थानिकांच्‍या समस्‍या, अडचणी लक्षात न घेता सॅटेलाईट यंत्रणेद्वारे बनविल्‍याने स्‍थानिकांना अनेक समस्‍यांना समोरे जावे लागत आहे.याबाबतचा आराखडा लोकांच्‍या लक्षात न आल्‍यामुळे आपणच शहाणे या अविभार्वात घाईगडबडीत काम सुरू केले आहे.अजूनही भूसंपादनाचे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.तरीही केंद्र सरकार भूसंपादनासाठी आणखी जागा मागत आहे.महामार्ग बनविताना पर्यायी मार्गांचा विचार केलेलाच नाही.त्‍यामुळे भूसंपादनासाठी आणखी जागा मागण्‍याची वेळ आलेली आहे. महामार्गालगत शेतकऱ्यांची शेतजमीन असल्‍याने उत्‍पन्न देणारी जागा आणखी कशी देणार? असा प्रश्‍‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. वाहनांच्‍या तुलनेत रस्‍ते कमी पडत आहेत.त्‍यामुळे सरकारने महामार्गाला पर्याय शोधला पाहिजेत.नपेक्षा भविष्‍यात वाहतूक समस्‍या आणखी जटिल होईल.
विकासाच्‍या दृष्‍टीने महामार्गाचे विस्‍तारीकरण योग्‍यच आहे. तरीही लोकांना गृहित धरून महामार्गाचे काम केले जात आहे. आवश्‍‍यक तेथे उड्डाण पूल, भुयारी मार्ग, शाळा, विद्यालयांजवळ सुरक्षिततेसाठी उपाय, सिग्‍नल यंत्रणा, गतिरोधक यांची पूर्तता लोकांच्‍या मागणीनुसार करणे आवश्‍‍यक आहे.पावसाळ्यात बांधकाम ठेकेदाराकडून पूर्णपणे दुर्लक्ष केल्‍यामुळे लोकांना गणेश चतुर्थी, दीपावली खड्डेमय रस्‍त्‍यांतून जाऊन साजरी करावी लागली. बांधकाम करतेवेळी अवजड वाहनांची वर्दळ, खोदकाम केलेल्‍या रस्‍त्‍यामुळे लोकांना धूळप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.संबंधित ठेकेदाराने दिवसातून तीनवेळा पाणी मारल्‍यास धूळ उडणार नाही, तसेच काम सुरू असल्‍याबाबतचे दिशादर्शक फलक, सूचना फलक लावणे आवश्‍‍यक आहे. मात्र, ते केलेले नाही. महामार्गाचे काम लवकरात लवकर होण्‍यासाठी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. स्‍थानिकांच्‍या समस्‍या लक्षात घेऊनच महामार्गाचे काम केल्‍यास त्‍याचे लाभ सर्वांनाच होतील.

 

महापालिका व कार्निव्हल

संबंधित बातम्या