वित्त आयोगाकडे मागितले महापालिकेने ५०० कोटी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:महापौर मडकईकर यांची माहिती माजी महापौरांचेही आयोगाला विकास निधीचे पत्र
पुढील पाच वर्षांसाठी शहरात करावयाच्या विविध कामांसाठी एकूण ५०० कोटींची मागणी केल्याची माहिती आज महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पणजी:महापौर मडकईकर यांची माहिती माजी महापौरांचेही आयोगाला विकास निधीचे पत्र
पुढील पाच वर्षांसाठी शहरात करावयाच्या विविध कामांसाठी एकूण ५०० कोटींची मागणी केल्याची माहिती आज महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात दाखल झालेल्या १५ व्या वित्त आयोगाबरोबर आज महापालिका, नगरपालिका आणि पंचायतीच्या प्रमुखांशी दोनापावला येथील तारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली.त्या बैठकीस महापालिकेच्यावतीने महापौर मडकईकर यांनी आपली बाजू मांडली.या बैठकीविषयी माहिती देताना मडकईकर म्हणाले, की वस्तू सेवा कर लागू झाल्यापासून महापालिकेला जकात कर बंद झाला आहे.पहिले राज्य सरकारच्या पेट्रोल पंपावरून इंधन मिळत होते, आता तेही मिळत नाही.यावर हे तपासले जाईल, असे उत्तर आयोगाच्या सचिवांनी दिले आहे.
मडकईकर पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे असणाऱ्या अभियंत्यांच्या सेवेचे काही महिनेच उरलेले असताना त्यांना महापालिकेत अधिकारी म्हणून पाठविले जाते.त्या अधिकाऱ्यांचे सरकारी देय रकमेप्रमाणे सेवेची सर्व रक्कम आणि निवृत्ती वेतनही महापालिकेला द्यावे लागते.त्यामुळे हा प्रकार दुभत्या गाईसारखा असून, दूध मिळेपर्यंत त्या गाईचे पालन पोषण करायचे आणि बंद झाले की दुसऱ्याकडे पाठवायची, असा प्रकार असल्याचे आपण आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.याची दखल आयोगाने घेतली असून, त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले.त्याचबरोबर पणजी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मंजूर झालेल्या ३१० शौचालयांसाठी वाढीव दरासह १.७८ कोटीपर्यंत खर्च होणार असल्याने त्याची फाईल चार महिने मंजूर होत नाही.त्यावर नगरविकास अधिकाऱ्यांनी शौचालयांच्या प्रकरणाची फाईल घेऊन यावे, त्यास आपण तत्काळ मंजुरी देतो असे आयोगासमोर सांगितले.
शहरातील विकासाविषयी आयोगासमोर विविध योजना मांडल्या.त्यात बायंगिणी कचरा प्रकल्प उभारण्यासाठी तीन ते चार वर्षांचा लागणारा कालावधी पाहता तीन ते चार ठिकाणी कमी क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्‍यक आहेत.तसेच मांडवी पुलाजवळील बहुमजली वाहन पार्किंग इमारतीपासून शहरात ई-रिक्षा सेवा २४ तास सुरू करण्याचा आमचा मानस आहे, त्यासाठी रिक्षा खरेदी कराव्या लागणार आहेत.शहरातील वारसास्थळांचे, जुन्या इमारतींचे जतन करणे अशी कामे महापालिकेला करावी लागत आहेत. क्रोएशियामध्ये ज्या पद्धतीने सेन्सरचा वापर करून पे-पार्किंगसाठी ॲपचा वापर केला जातो, त्या पद्धतीने पणजी शहरात सेवा सुरू करण्याचा माणस असून, एकूण ५०० कोटी रुपयांची आम्ही आयोगाकडे मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

साळगावात भूमिगत वीजवाहिन्‍या

फुर्तादो यांची ९८० कोटींची मागणी
माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी आपण १५ व्या वित्त आयोगाकडे ९८० कोटींची मागणी केल्याचे सांगितले.या मागणीचे पत्र आपण कुरियरद्वारे वित्त आयोगाला, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पाठविले आहे, तर महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्ज आणि महापौर उदय मडकईकर यांना प्रत दिलेली आहे. त्यात आपण पणजी शहरासाठी ९८० कोटी मागितले आहेत. १४ व्या वित्त आयोगाकडे आपण सुमारे ११०० कोटी मागितले होते, पण त्यावेळी केवळ ४ कोटी मिळाले होते, असे फुर्तादो म्हणाले.फुर्तादोंनी ९८० कोटी रुपये वित्त आयोगाला मागितल्याच्या विषयावर विचारले असता जर त्यांनी मागितला आहे, तेवढा निधी आला तर फारच बरे होईल, असा टोमणा मडकईकर यांनी मारला.

 

संबंधित बातम्या