महापालिकेच्या कारवाईमुळे गाडेधारक अस्वस्थ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:डॉन बास्को शाळेजवळील रस-ऑम्लेट पाव, पाणीपुरी विकणाऱ्या हातगाडेधारकांचे गाडे महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे हे गाडेधारक अस्वस्थ झाले आहेत.दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेने गाडेधारकांच्या बाजूला असणाऱ्या गटारांत घाण पाणी टाकल्याने तुंबल्याच्या कारणावरून लिंबू-सोडा विक्रेत्यांचे गाडे सोडून इतर गाडेबंद असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागला आहे.

खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांमध्ये रस-ऑम्लेट पाव, पाणीपुरी विक्री करणाऱ्यांचे हातगाडे लागत होते. परंतु या हातगाड्यांपैकी काहीजण आपले भांडी धुतलेले आणि इतर कचरा बाजूच्या गटारांत टाकून जात होते. ही गटारे वाहती नसल्यामुळे हा सर्व कचरा तुंबून राहिल्याने त्याची दुर्गंधी पसरली होती.आजूबाजूच्या रहिवाशांनी आणि डॉन बॉस्को विद्यालयाच्या व्यवस्थापनाने या दुर्गंधीविषयी महापालिकेकडे तक्रार केली होती.या तक्रारीमुळे महापालिकेने दि. ६ रोजी दुपारी गटारांवरील लाद्या उघड्या केल्या.तरीही रात्री गाडेधारकांनी या घाणीच्या शेजारी आपला व्यवसाय सुरू ठेवला.त्यामुळे महापालिकेने ७ जानेवारीला सकाळी-सकाळी त्या ठिकाणी उभ्या असलेले गाडे उचलून आणले.
उचलून आणलेले गाडे महापालिकेने आपल्या ताब्यात ठेवले आहेत.याविषयावर नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ५ फेब्रुवारीला या गाड्यांसाठी निश्‍चित जागा करण्याविषयी निर्णय घेण्यावर एकमत झाले.त्यामुळे या गाडेधारकांना ५ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.काही गाडेधारकांकडे तीन-चार कामगार काम करीत असून, त्यांना एक महिन्याचा पगार द्यावा लागणार असल्याची चिंता या गाडेधारकांना लागली आहे.शिवाय जागा निश्‍चित नाही झाल्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागण्याची भीतीही त्यांना सतावत आहे.एका-दोघांच्या चुकीमुळे दुसऱ्यांनाही त्याचा फटका बसला असल्याची प्रतिक्रिया गाडेधारक रवी शेट्टी यांनी ‘गोमन्तक'ला सांगितले.आत्तापर्यंत आमची या जागेवरून त्या जागेवर अशी कसरत सुरू आहे, त्यामुळे महापालिकेने आता कायमस्वरुपी जागा द्यावी, त्याशिवाय अटींचे पालन न करणाऱ्यांवर जरूर कारवाई करावी, असेही शेट्टी म्हणाले.

गोवा बझारसाठी प्रयत्न

संबंधित बातम्या