म्हापशात ‘रवी की याद फिरसे’ सांगितीक कार्यक्रम

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

खोर्ली : स्व. रवींद्र मयेकर यांना त्यांच्या जिवलग मित्रांतर्फे सांगितीक श्रद्धांजली वाहण्याचा एक अनोखा उपक्रम म्हापशात नुकताच घेण्यात आला.

ज्ञानेश्वरीचे सुप्रसिद्ध गाढे अभ्यासक प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे चिरंजीव स्व. रवींद्र मयेकर यांचा जलसमाधी होऊन अकाली मृत्यू झाला होता. त्यांचे जिवलग मित्र सुनील शेट्ये हे स्व. रवींद्र यांच्याबरकोबर इंजिनिअरिंग कॉलेजचा बॅचमेट होते. या दोघांनीही सर्वत्र फिरण्यात मौजमजेत तसेच अभ्यासातही बरोबर असायची. या आठवणी म्हणून रवींद्र यांच्या स्मरणार्थ सांगितिक कार्यक्रम पार पडला.

खोर्ली : स्व. रवींद्र मयेकर यांना त्यांच्या जिवलग मित्रांतर्फे सांगितीक श्रद्धांजली वाहण्याचा एक अनोखा उपक्रम म्हापशात नुकताच घेण्यात आला.

ज्ञानेश्वरीचे सुप्रसिद्ध गाढे अभ्यासक प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे चिरंजीव स्व. रवींद्र मयेकर यांचा जलसमाधी होऊन अकाली मृत्यू झाला होता. त्यांचे जिवलग मित्र सुनील शेट्ये हे स्व. रवींद्र यांच्याबरकोबर इंजिनिअरिंग कॉलेजचा बॅचमेट होते. या दोघांनीही सर्वत्र फिरण्यात मौजमजेत तसेच अभ्यासातही बरोबर असायची. या आठवणी म्हणून रवींद्र यांच्या स्मरणार्थ सांगितिक कार्यक्रम पार पडला.

गत वर्षी तर अगदी मोठ्या प्रमाणात ‘एक श्याम रवी के नाम’ असे नामाभिधान घेऊन हिंदी मराठी गाण्यांचा जलसा म्हापशाच्या हनुमान नाट्यगृहात संपन्न झालेला. वडील गोपाळराव मयेकर सपत्नीक अगदी व्हीलचेअरमधून उपस्थित राहिलेले. बाकी बंधू-भगिनी आणि मोठ्या संख्येने रवींची मित्रमंडळी जमून एक आगळावेगळा गीत-संगीताद्वारे आवडत्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या सांगितीक कार्यक्रम केला होता.

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, प्रसिद्ध निवेदक गोविंद भगत आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यादगार झालेला. यंदाही मोठ्या प्रमाणात नसला तरी छोटेखानी स्वरूपात दत्तवाडी-म्हापसा येथील इंद्रधनुष या नव्या सुंदर सुबक छोट्या हॉलमध्ये रवीच्या निमंत्रित मित्रमंडळींच्या उपस्थितीत यंदाचा ‘रवी की याद फिरसे’ या नामाभिधानाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यंदाच्या कार्यक्रमाला गोव्याचे सुप्रसिद्ध कलाकार साईबाबा फेम देवानंद मालवणकर, कोकणी चित्रपट आमोरी ह्या सिनेमातील कलाकार कु. सबिता कुरतडकर, सुप्रसिद्ध डॉक्टणर राजेश भटकुर्से व प्रसिद्ध सितारवादक योगेश हिरवे उपस्थित होते .

देवानंद मालवणकर यांनी स्व. रवींद्र मयेकर यांच्या आठवणी जाग्या करताना सर्वांना सद्गरदित करून सोडले. आपण कसे घडत गेलो, बालपणीच्या आठवणींचा तो काळ मित्रांच्या संगे धम्माल करत आपण कसे मोठे होत गेलो, याचा सुरम्य इतिहास त्यांनी आपल्या भाषणातून उभा केला.

कार्यक्रमाचे आयोजक सुनील शेट्ये यांनीही उपस्थितांचे स्वागत करताना रवींद्र मयेकर यांचे जीवन म्हणजे नुसते जगणे नाही तर ते एकंदरीत विविध छंद जोपासत साजरे करणे होते, असे सांगितले. रवी बद्दल भरभरून बोलताना रवी जणू अवतीभवती वावरत असावा असाच भास होत असल्याचा त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर दत्तवाडी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष संदीप फळारी उपस्थित होते. त्यांनीही असा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून अशा नाविन्यपूर्ण कल्पकतेतून आपल्या आवडत्या जिवलगांच्या स्मृती जपायला हव्यात असे सांगितले.

मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येऊन नंतर मधूर गाण्यांचा सिलसिला रवीच्या चाहत्यांना ‘शब्द सुरावटी’च्या माध्यमातून रवीच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवून गेला. हुबेहूब किशोर कुमार गात आहे, असे वाटायला लावणारे वास्कोचे राजीव किशोर यांनी जीव ओतून गाताना रवीच्या आठवणी ताज्या करत आपल्या सुमधूर स्वरांनी रवीला श्रद्धांजली वाहिली. जोडीला गोव्याचा प्रसिद्ध आणि जोशिला गायक समृद्ध चोडणकर यांनीही उडत्या चालीची गाणी आपल्या खास अदाकारीने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

प्रा. सुनील शेट्ये यांनीही रवीच्या आठवणीने भाऊक होत दर्द भरी गाणी सादर केली. सागर च्यारी, सौ. युक्ता नाईक, संजय व सुरेंद्र शेट्ये यांनीही रवींद्र मयेकर यांच्या मधुर स्मृतींना गोड आवाजातली गाणी समर्पित केली. शब्द सुरांच्या झुल्यावर रसिक प्रेक्षक झुलत असतानाच डॉ. राजेश भटकुर्से व ॲड. योगेश हिरवे यांनी कार्यक्रमाच्या मध्यावर अनुक्रमे तबला आणि सतार वादनाची जुगलबंदी सादर करून कार्यक्रमाचा स्तर वाढविला.

गत वर्षीच्या ‘रवी के नाम एक श्याम’ या कार्यक्रमाची दृकश्राव्य चित्रफित घडीभर दाखवून मागील वर्षाच्या कार्यक्रमाची उंची गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला. ध्वनिचित्रफीत कुमार सौजस शेट्ये यांनी स्वत:च्या उत्कृष्ट निवेदनाद्वारे तयार केलेली. कु. वेदिका वाळके यांनी ‘रवी की याद फिरसे’ या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले.

 

संबंधित बातम्या