नानोडा गावाला रस्त्याच्या दुरुस्तीचे वेध; प्रशासनाचे दुर्लक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

अस्नोडा:लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.नानोडा गावात अनेक ठिकाणचे रस्त्यांवर खड्डे पडले असून, खडी उखडलेल्या अवस्थेत सद्यःस्थितीत रस्ते आहेत.त्यामुळे गावातील सर्वच रस्त्यांचे त्वरित हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.

अस्नोडा:लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.नानोडा गावात अनेक ठिकाणचे रस्त्यांवर खड्डे पडले असून, खडी उखडलेल्या अवस्थेत सद्यःस्थितीत रस्ते आहेत.त्यामुळे गावातील सर्वच रस्त्यांचे त्वरित हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
डिचोली मतदारसंघाचे माजी मंत्री पांडुरंग राऊत यांच्या कारकिर्दीत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आजतागायत या रस्त्याकडे कोणाही लोकप्रतिनिधी अथवा आमदाराने जाणीवपूर्वक लक्ष दिलेले नाही.गेले कित्येक पावसाळ्यामागून पावसाळे उलटले तसे मतदारसंघात आमदारही बदलून गेले.राऊत यांच्या नंतर माजी मंत्री स्व. भटाळे, माजी आमदार नरेश सावळ आणि विद्यमान आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर या आमदारांनी आपली हयात मतदारसंघाच्या सेवेसाठी घालविली.परंतु अद्याप नानोडा गावातील रस्ता मात्र खाचखळगे आणि उखडलेल्या खडीमुळे ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.
नानोड्यातील रस्त्यांची पावसाळ्यानंतर दुरूस्ती होणार, असे पालुपद सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरवर्षी ऐकावयास मिळत आहे.गावचे पंच सदस्य न चुकता लाटंबार्से प॑चायतीच्या बैठकीत रस्त्याबाबत ठराव मंजूर करीत असल्याचे सांगतात.परंतु ग्रामस्थांच्या पदरी निराशेशिवाय आणि रस्त्याच्या खाचखळग्यांशिवाय काहीही पडलेले नाही. दूरवस्था झालेल्या रस्त्यावर अचानकपणे कोणीतरी गतिरोधक बसविण्याची मागणी केल्यामुळे तात्काळ गतिरोधक बसविले गेलेले आहेत.हा मोठा विनोदाचा भाग बनून राहिलेला आहे.

भाविकांच्या प्रश्नामुळे ग्रामस्थ खजिल...
नानोडा गावात अनेक मंदिरे आहेत.गोवा परवशतेच्या पाशात बद्ध असताना पोर्तुगीज काळात बाटाबाटीआणि मंदिरांच्या तोडफोडीमुळे ग्रामस्थांनी आपल्या ग्रामसंचितांचे रक्षण करताना बार्देश तालुक्यातील अनेक गावातील ग्रामदैवतांचे स्थलांतरण सुरक्षित ठिकाणी झाले.यात लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावात कळंगुटची श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण, कांदोळीची शांतादुर्गा कांदोळकरीण, हडफडेचा चौरगीनाथ, बस्तोड्याचा श्री सत्पुरुष, म्हापशातील डांगी समाजाचे कुलदैवत श्री महालक्ष्मी आणि नानोडा गावचे ग्रामदैवत श्री सातेरी पुरमार अशा प्रमुख सात देवस्थानांचा जागृत अधिवास नानोडा गावात असून, प्रत्येक देवस्थानात साजरे होत असलेले जत्रा, शिमगा आणि वेळोवेळी होणाऱ्या अनेक उत्सवांसाठी परगावच्या हजारो नागरिकांची नानोडा गावात रोज ये-जा असते.अशावेळी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ते लोक ग्रामस्थांना विचारतात तेव्हा ग्रामस्थांना खजिल व्हावे लागते.

विद्यापीठातील उपहारगृह चालक बदलला

ना हरकत दाखल्यामुळे अडले काम...
अंगणवाडीत जाणाऱ्या छोट्या मुलांना अक्षरश: कडेवर घेऊन पालक पोहचवत आहेत.इतकी रस्त्याची धास्ती महिलावर्ग व विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतलेली आहे.डिचोलीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाशी संपर्क साधला असता, इस्टिमेट केलेले आहे.रस्त्याच्या अंतिम भागासाठीचा ना हरकत दाखला मिळाल्याशिवाय काम करता येणार नसल्याचे डिचोलीचे कार्यकारी अभियंता गावकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या