स्व. नारायण आठवले पुरस्कार वितरण रहित

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

प्रतिष्ठान दरवर्षी स्व. नारायण आठवले पत्रकारीता पुरस्काराचे वितरण २८ एप्रिल रोजी करते.

पणजी

 गोमन्तकचे माजी संपादक स्व. नारायण आठवले यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्काराचे यंदा वितरण न करण्याचा निर्णय आयोजक लोकविश्वास प्रतिष्ठानने घेतला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर यांनी ही माहिती दिली.
प्रतिष्ठान दरवर्षी स्व. नारायण आठवले पत्रकारीता पुरस्काराचे वितरण २८ एप्रिल रोजी करते. यंदा कोविड टाळेबंदीच्या काळात २८ एप्रिल आल्याने तसेच देशात कोविड १९ ची महामारी पसरली असल्याने नजीकच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे प्रस्तुत ठरणार नसल्याने यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या व पुढील वर्षाच्या पुरस्कारांचे वितरण पुढील वर्षी २८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
यंदाचा पुरस्कार मुंबईतील पत्रकार जयश्री खांडेकर पांडे यांना जाहीर करण्यात आला होता. मडगाव येथील रवींद्र भवनात हा सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र पुरस्कार वितरण सोहळाच रद्द करण्यात आल्याने हा सोहळा यंदा होणार नाही, असे प्रियोळकर यांनी सांगितले. दरवर्षी एका विभागातील पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात येतो. समितीसमोर त्यासाठी मुंबईतील अनेक पत्रकारांची नावे आली होती त्यातून खाडीलकर पांडे यांचे नाव स्व. नारायण आठवले पत्रकारीता पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले होते.

संबंधित बातम्या