गोव्यातील शिक्षकांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नाशिक येथील राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार शिक्षक वासुदेव गावकर यांना प्रदान करताना नाशिकचे समाज कल्याणमंत्री ॲड. राहुल ढिकले, सोबत नानासाहेब बोरस्ते, बी. जी. वाघसाहेब, सत्कारमूर्ती दीपा खोलकर, सुशीला हळर्णकर, अमिता देसाई व मान्‍यवर.

पणजी: नाशिक येथील ऋणमोचन बहुउद्देशीय संस्था आणि भावना बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने गोवा, महाराष्ट्र व इतर राज्यातील शिक्षकांना राष्ट्रीय जीवन गौरव व नाशिक रत्नभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.या सोहळ्यात गोव्यातील चार शिक्षकांना राष्ट्रीय जीवन गौरव व नाशिक रत्नभूषण पुरस्कार करण्यात आला.

खडकी श्रीराम हायस्कूलचे शिक्षक तथा भिरोंडा सत्तरी येथील साहित्यिक, समाज कार्यकर्ते, आदर्श शिक्षक तसेच कवी वासुदेव बाबाजी गावकर, शिशु विकास हायस्‍कूल रावण फोंड मडगाव येथील ज्येष्ठ शिक्षिका तसेच कवयित्री, साहित्यिक दीपा दिलीप खोलकर, लोयले उच्च माध्यमिक विद्यालयाची शिक्षिका सुशीला निळकंठ हळर्णकर व आगोंद काणकोण येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाची ज्येष्ठ शिक्षिका अमिता देसाई आदींना पुरस्कार प्राप्त झाले आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच औरंगाबादकर सभागृह शालीमान नाशिक येथे झाला. कार्यक्रमाला नाशिकचे बबनरावजी घोलप, समाज कल्याणमंत्री ॲड. राहुल उत्तमराव ढिकले, आमदार नानासाहेब बोरस्ते, निवृत्त जिल्हाधिकारी बी.जी. वाघसाहेब, निवृत्त वायुसेना दलचे डॉ. जे. व्ही. दुफारे तसेच इतर प्रतिष्ठीत अधिकारी, दोन्ही संस्थांचे अध्यक्ष, सचिव व इतर प्रतिनिधी व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी शिक्षक वासुदेव गावकर म्हणाले की, आपण बालपणापासून वडील व इतरांकडून मिळालेल्या चांगल्या संस्कारामुळेच आपण समाजकार्य तसेच शिक्षक पेशात चांगली कामगिरी करु शकलो. गोव्यातील चारही शिक्षकांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रात दिलेल्या चांगल्या योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

 

आरक्षण जाहीर न झाल्याने तयारीसाठी विलंब

संबंधित बातम्या