कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या ‘झेपर’ यंत्रावर सरकारची भिस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजी: सोनसोडो येथील साठवलेल्या कचऱ्यावर गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने प्रक्रिया सुरू केली असली तरी मडगावातील दैनंदिन कचरा समस्येवर तोडगा शोधणे सरकारने सुरूच ठेवले आहे. यासाठी एका यंत्राविषयी माहिती पुरवण्याची मागणी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने केंद्र सरकारला केली आहे.

केंद्र सरकारने भारतात गुंतवणूक करा व उत्पादन करा म्हणजे मेक इन इंडियांतर्गत मागच्या महिन्यात दिल्लीत एका परिषदेचे आयोजन केले होते. त्या परिषदेला राज्य सरकारचा एक अधिकारी उपस्थित होता. त्या परिषदेत झेपर नावाच्या एका यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. त्या यंत्राच्या माध्यमातून कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती थेटपणे करता येत होती. त्या यंत्राबाबत त्या अधिकाऱ्याने पर्यावरण खात्याला माहिती दिल्यानंतर आता मडगावमध्ये त्या यंत्राचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी या यंत्राची माहिती द्यावी अशी मागणी त्या परिषदेच्या संयोजकांकडे पर्यावरण खात्याने केली आहे. या यंत्राला किती अल्पावधीत बसवता येऊ शकते अशी विचारणाही करण्यात आली आहे.

मडगावात दररोज ६२ टन कचरा

मडगावमध्ये दररोज ६२ टन कचरा तयार होतो. त्यात मिश्रीत म्हणजे वर्गवारी न केलेला २६ ते ३० टन कचरा असतो. त्यामुळे त्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न सरकारी यंत्रणा व पालिकेसमोरही आहे. झेपर यंत्राच्या माध्यमातून त्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या पर्यायावर त्यामुळे आता विचार कऱण्यात येत आहे.
 
संबंधित बातम्या