करमळी तलावाकडे सरकारचे दुर्लक्ष..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

करमळी:सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकास शक्य; सरकारच्या इच्छाशक्तीची गरज
तिसवाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला वन खात्याचा करमळीचा तलाव हळुहळू दुर्लक्षित होत असल्याचे चित्र येथे दिसत असून एक चांगले पर्यटनस्थळ व्हावे व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे.

करमळी:सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकास शक्य; सरकारच्या इच्छाशक्तीची गरज
तिसवाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला वन खात्याचा करमळीचा तलाव हळुहळू दुर्लक्षित होत असल्याचे चित्र येथे दिसत असून एक चांगले पर्यटनस्थळ व्हावे व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे.
करमळीचा तलाव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे.या तलावात अनेक पक्ष्यांचा वास असतो. परदेशी पक्षी दरवर्षी येथे वास्तव्यास येतात. एक चांगले पर्यटनस्थळ व्हावे असे तत्कालीन स्थानिक मंत्री व विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांचे स्वप्न होते.त्यांच्या आजारपणामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. स्थानिक लोकांनी पाहिलेल्या स्वप्नाचाही चुराडा झाला. विद्यमान सरकारने यावर विचार केल्यास एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते.
तलावाचा परिसर नितांत सुंदर व देखना आहे. प्रसिध्द जुने गोवे परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर हा तलाव वसलेला आहे. हा तलाव राज्य सरकारकडून दुर्लक्षिला गेलेला असला, तरी विदेशी छायाचित्रकारांना मात्र तो वरदान ठरला आहे. अभ्यासू पक्षीमित्र, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर आदी कलाकार मंडळी चित्रणासाठी येथे गर्दी करतात.एक व्यवसाय म्हणून जोपासतात व लाखो रुपये कमावतात. गोवेकर मात्र या बाबतीत खूपच मागे राहिले आहेत असे चित्र दिसून येते.करमळी गावच्या विकासकामाच्या दृष्टीकोनातून या तलावाचा विचार फक्त सुशोभिकरणापुरता न ठेवता तेथे विविध उपक्रम राबवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आजही स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते.
एका विदेशी छायाचित्रकाराने येथे दिलेल्या माहितीनुसार, या तलावात अनेक वर्षे जीवन जगणाऱ्या पक्ष्यांना येथील पाण्यात वाढणाऱ्या विषारी वृक्षवल्ली, विषारी सरपटणारे प्राणी व साप तसेच शिकारी माणसांची भीती असते. यासाठी चांगल्या पद्धतींने अशा सरोवराची निगा राखली गेली पाहिजे. नवीन पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे. सरकारने या तलावाकडे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. सरकारला हे सहज शक्य आहे. छायाचित्रकारांनी येथून घेतलेली छायाचित्रे, व्हिडिओचित्रण याद्वारे विदेशात त्यांच्या चांगल्या डॉक्युमेंटरी तयार होतात. खास प्रदर्शने भरविली जातत. यातून लाखो रुपयांची त्यांची कमाई होते.काही व्यावसायिक व हौशी कलाकार यात स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतात.गोव्यातील किंवा स्थानिक हौशी छायाचित्रकारांना व्यवसाय म्हणून हा छंद जोपासता येईल, असेही पुढे आपल्या माहितीत ते सांगतात.गोवा सरकारने नितांत सुंदर अशा गोमंतकातील या तलावाचा वापर फक्त एकाच कारणासाठी न करता बहुउद्देशीय दूरदॄष्टीने यावर विचार करावा. येथे अनेक चांगले उपक्रम राबवता येतील.यातूनच स्थानिकांना रोजगार मिळू शकतो अशा प्रतिक्रिया काही स्थानिकांनी या प्रतिनिधीकडे बोलून दाखविल्या.

पश्चिम बगलमार्ग खांबांवरच:फ्रान्सिस सार्दिन​
सुशोभिकरणाचे काम थांबले...
या तलावाचे चांगले पर्यटन स्थळ व्हावे या उद्देशाने येथील सुशोभिकरणाचे काम काही वर्षांपूर्वी सरकारतर्फे हाती घेतले होते अशी माहिती उपलब्ध आहे. तळ्याच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये. यासाठी भक्कम संरक्षक भिंतही बांधण्यात आली होती. पदपथावर चांगले पेवर्स बसविण्यात आले होते. अन्य काम बाकी होते. यानंतर सुशोभिकरणाचे काम ठप्प झाले. या मागील कारण समजू शकले नाही. सध्या हे तळे दयनीय स्थितीत आहे. पदपथावर टाकलेले पेवर्स ठिकठिकाणी उखडलेले आहेत. तळ्यालगतचा रस्ताही दयनीय स्थितीत आहे. पाण्यात झाडी वाढलेली आहे. अशा स्थितीत परदेशी पक्ष्यांनी या तळ्याकडे पाठ फिरवली आहे.

गैरसोयीबद्दल पर्यटक नाराज.
करमळीच्या रेल्वे स्टेशनवर दररोज पर्यटकांची गर्दी दिसते. हे प्रवासी खास येथील तलाव व ऐतिहासिक अशी गिरीजाघरे पाहण्यासाठी येतात व येथे पर्यटकांची बरीच गैरसोय होत असल्याची नाराजी व्यक्त करतात. सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये अशी त्यांचीही मागणी आहे.

इएसआय इस्पितळ राज्य सरकारच्या ताब्यात: कामगारमंत्र्यांची घोषणा

दहा पक्ष्यांच्या जातीचे वास्तव्य
उपलब्ध माहितीनुसार, एकूण दहा पक्ष्यांच्या जाती विपुल प्रमाणात या तळ्यात राहतात. यात पाण कोंबडा, जांभळा मूरेहॅन, खास तळ्यातील बगळा, लहान बगळा, पिंटेल, शिटी वाजवणारा निळा पक्षी आदी पक्षांच्या जातींचा त्यात समावेश आहे. या तळ्याच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर घोळक्या घोळक्याने भक्ष शोधण्यासाठी ते टपून बसलेले असतात.

संबंधित बातम्या