नेत्रावळी क्षेत्रातील प्रलंबित दावे निकालात!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सांगे:नेत्रावळी अभयारण्य क्षेत्राची घोषणा झाल्यास लवकरच अधिसूचना जारी
सरकारने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.आता काही दिवसात नेत्रावळी अभयारण्यातील जनतेचे प्रलंबित दावे निकालात काढण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे, सांगे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी स्पष्ट केले. नेत्रावळीत कार्यालय सुरू केल्यानंतर या कामाला गती प्राप्त होणार असली तरी तूर्त जनतेचे दावे सांगे उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार असल्याचे अजय गावडे यांनी सांगितले.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्राची घोषणा झाल्यास २० वर्षे उलटली.परंतु अद्याप सरकारी पातळीवरून लोकांचे दावे निकालात काढण्याची कोणतीही हालचाल करण्यात आली नव्हती.पण दोन महिना आधी नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील दावे निकालात काढण्यासाठी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांची नियुक्ती करण्यात आली असताना त्यांनी कार्यभार हाती घेण्याआधीच त्यांची इतरत्र बादली केल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही.आता पुन्हा अजय गावडे यांची सांगेचे उपजिल्हाधिकारी म्हणून व नेत्रावळी अभयारण्य खास अधिकारी म्हणून निवड झाल्याने या क्षेत्रातील दावे निकालात काढण्यासाठी शासकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू केल्याने जनतेत समाधान पसरले आहे.सरकारने जनतेची कामे जलदगतीने हाता वेगळी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पुरविणे आवश्यक आहे.आता नेत्रावळीतील कामाचा अतिरिक्त ताण उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पडणार असल्याने आधीच अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सर्वच कामावर परिणाम जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांची काम करण्याची सतत धडपड सुरू असते.आता त्यांच्याकडे सांगे उपजिल्हाधिकारी, कुडचडे पालिकाधिकारी, कुडचडे रवींद्रभवन आणि नेत्रावळी अभयारण्य खास अधिकारी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या असल्या तरीही काम करण्याचा उत्साह कायम असतो.
सर्व ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ मिळाल्यास सरकारने दिलेल्या जबाबदाऱ्या सहज पार पडण्याची तयारी त्यांची असते.अशा अधिकाऱ्यांकडून नेत्रावळीतील जनता खूप अपेक्षा बाळगून आहे.सरकारने अपुरा कर्मचारी वर्ग त्वरेने पुरवून गेल्या २० वर्षांपासून अडून राहिलेले काम पूर्ण करून घेण्याची मागणी नेत्रावळीवासीय करीत आहेत.

स्‍थानिक टॅक्‍सी व्‍यावसायिकांना फटका:कारवाई करण्‍याची मागणी

संबंधित बातम्या