नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील जंगली जनावरांचा उपद्रव

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

गवा रेड्याची दुचाकीला धडक
मानगाळ चेकनाक्याजवळील घटना

दोघे जखमी, वनविभागाकडून उपाययोजनेबाबत दुर्लक्ष

ही घटना काणकोणला जात असताना संध्याकाळच्यावेळी घडली.

सांगे :  नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील जंगली जनावरांचा उपद्रव दर दिवशी अधिकच वाढू लागला आहे. गुरुवारी नेत्रावळी मानगाळ मार्गे काणकोणला जाणाऱ्या रुपेश वेळीप व सुगंधा सालेलकर यांच्या दुचाकीला संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान मानगाळ येथील वनखात्याच्या चेकनाक्याजवळ गवा रेड्याने धडक दिल्याने अपघात झाला. यात दोघेही किरकोळ जखमी झाले, मात्र दुचाकीची मोडतोड झाली. 

दुचाकी क्र.जीए१० १७८९ ही घेऊन रुपेश वेळीप हा सुगंधा सालेलकर यांना काणकोणला सोडण्यासाठी जात असताना मुख्य रस्त्यावर दुचाकीला गवा रेड्याने धडक दिली. या धडकेत दोघेही किरकोळ जखमी झाली. रानटी प्राण्यांचा दिवसेंदिवस धोका वाढत असून झोपी गेलेला वनविभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

नेत्रावळी अभयारण्य भागात मोठ्या प्रमाणात रानटी जनावरांचा संचार वाढला असून संध्याकाळ नंतर दुचाकी घेऊन अभयारण्य क्षेत्रात फिरणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. सरकारने आता या उपद्रवी प्राण्यापासून लोकांना निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी पंच अभिजित देसाई यांनी केली आहे. 

नेत्रावळी ते उगे पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर अनेक वेळा रानटी जनावरांमुळे अपघात घडलेले आहे. या मुख्य रस्त्यावर दुतर्फा सौरऊर्जा कुंपण घालण्याची अनेकदा मागणी करूनही अद्याप काहीच उपाययोजना वनखात्याने आखलेली नाही. 

खनिज निर्यात व्यापारासाठी सामायिक अपेक्षा​

वनविभागाला जाग कधी येणार
रानटी प्राण्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. हे उपद्रवी प्राणी आता थेट मानवी वस्तीपर्यंत पोहचत असल्याने अन्‌ वनविभागा कोणतीय कार्यवाही करत नसल्याचे दिसत आहे. या झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार असा सवाल नेत्रावळी परिसरातील नागरिकांमधून सरकारला केला जात आहे.

 

संबंधित बातम्या