तंबाखूवरील निर्बंधांसाठी नवा कायदा चालीस लावण्‍याची गरज

Dainik Gomantak
सोमवार, 13 जानेवारी 2020

पणजी, 
राज्‍यातील तरूण पिढी तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या आहारी जात आहे. हे प्रकार कमी होण्‍यासाठी नवीन तंबाखू विक्री परवाना कायदा चालीस लावण्‍याची मागणी राष्‍ट्रीय तंबाखू उच्‍चाटन संस्‍थेने केली आहे. 
संस्‍थेचे सचिव डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्‍या निवेदनात राज्‍यातील १० टक्‍के लोक विविध मार्गांनी तंबाखूजन्‍य पदार्थ सेवन करीत असल्‍याचे समोर आले आहे. राष्‍ट्रीय तंबाखू उच्‍चाटन संस्‍था आणि दिल्‍लीस्‍थित ग्राहक आवाज या संस्‍थानी या प्रकारावर नियंत्रण आणण्‍याची गजर असल्‍याचे डॉ. साळकर यांचे म्‍हणणे आहे. 

कंझ्‍युमर व्‍हॉईसचे मुख्‍य अधिकारी आशिम सन्‍याल यांच्‍या माहितीनुसार, सिगारेट आणि तंबाखुजन्‍य पदार्थांच्‍या विक्रीमुळे या गोष्‍टी तरूणांना लगेच प्राप्‍त होतात. नवीन कायद्यामुळे यावर निश्‍‍चीत मर्यादा येईल. सिगारेट विकण्‍याचे प्रमाण येथे ९७ टक्‍के असून कँडी चिप्‍स अशा पध्‍दतीने होणार्‍या विक्रीचे प्रमाण ८५ टक्‍के असल्‍याने तरूण पिढी यात भरडली जात आहे. 

संबंधित बातम्या