मुंबई उच्च न्यायालयाचा नवीन आदेश

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

राज्यातील १८ न्यायाधीशांच्या बदल्या
६ जिल्हा व सत्र तर वरिष्ठ विभागातील १२ जणांचा समावेश

दक्षिण गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांची उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी व या जागी असलेले न्यायाधीश इर्शाद आगा यांची बदली त्यांच्या जागी करण्यात आली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पॉल शेरीन गेरतुर्दे यांना असलेल्या ठिकाणीच पणजीत ठेवण्यात आले आहे.

पणजी : गोव्यातील विविध न्यायालयातील १८ न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयातर्फे काढण्यात आल्या आहेत. यामध्ये ६ न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालयातील आहेत तर १२ न्यायाधीश हे वरिष्ठ नागरी विभागातील न्यायालयातील आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस. बी. अगरवाल यांनी हा आदेश काढला आहे.

औद्योगिक लवाद तथा कामगार न्यायालय, पणजी -१ चे अध्यक्षीय अधिकारी विन्सेंट डिसिल्वा यांची बदली म्हापसा व पणजी येथे करण्यात आली आहे. मडगावचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांची बदली पणजी येथे करण्यात आली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बेला नाईक यांना पणजीतच ठेवण्यात आले आहे. म्हापशाचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांची बदली पणजी तेथे करण्यात आली आहे.

मडगावचे हंगामी जिल्हा व सहाय्यक सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील, पणजीचे हंगामी जिल्हा व सहाय्यक सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर, पणजीचे जिल्हा व सहाय्यक सत्र न्यायाधीश दुर्गा मडकईकर व पणजीचे हंगामी जिल्हा व सहाय्यक सत्र न्यायाधीश शेख शेबनम यांची बदली न करता सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यात आले आहे.

मडगावे मुख्य न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश एन. एस. आमोणकर यांची म्हापसा व पणजी, फोंडा व पणजीचे मुख्य न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश अनिल स्कारिया यांची मडगाव येथे, मडगावचे मुख्य न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश राम सुब्राय प्रभू देसाई यांची पणजी येथे, वास्कोचे मुख्य न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांची मडगाव येथे, मडगावचे मुख्य न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश सई अनिल प्रभुदेसाई यांची फोंडा व पणजी येथे, पणजीचे गोवा जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या सचिव रैना शैला फर्नांडिस यांची फोंडा व पणजी येथे तर पणजीच्या गोवा जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या सचिव शुभदा अच्युत दळवी यांची वास्को येथे, म्हापसा - पणजी येथील हंगामी नागरी वरिष्ठ विभाग तसेच प्रथमश्रेणी न्यायाधीश सारिका निलेश फळदेसाई यांची मडगाव येथे, म्हापसा - पणजी मुख्यन्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश शांताश्री शांताराम सिनाय कुडचडकर यांची पणजी येथे, पेडणे - पणजी

जिल्हा पंचायत निवडणूक प्रकरणी विरोधकांचे आरोप

मुख्यन्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश मनिषा मंगलदास शेट पारकर ऊर्फ मनिषा शैलेश नार्वेकर यांची डिचोली - पणजी येथे, डिचोली - पणजी न्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश सुमन चंद्रकांत गाड यांची पेडणे येथे, केपे - मडगाव न्यायदंडाधिकारी निलिमा श्रीकांत काणकोणकर यांची म्हापसा - पणजी येथे, पणजी मुख्यन्यायदंडाधिकारी व प्रथमश्रेणी न्यायाधीश जुदे तोरेक्स सिक्वेरा यांची सत्तरी - वाळपई - पणजी येथे तर सत्तरी - वाळपई - पणजी मुख्यन्यायदंडाधिकारी गिरीजा गोविंद गांवकर (रेणू सिंग) यांची केपे - पणजी येथे बदली करण्यात आली आहे.

 

 

 

संबंधित बातम्या