यंदा वाढदिवस साजरा करणार नाही : कामत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

पणजी : गोव्याची जीवनदायीनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक राज्याने पूर्ण तयारी केली आहे. संपूर्ण गोव्याचे वाळवंट होण्याचे भयंकर संकट आज गोमंतकीयांसमोर उभे ठाकले आहे. या संकटाचा सामना करणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. गोव्यावर संकटाचे काळे ढग आलेले असताना, माझा वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली.

त्यांनी नमूद केले आहे की, आज कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत असून त्यापासून बचाव करण्याची व योग्य खबरदारी घेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. म्हादईसाठी लढा देण्याची सर्वांनी तयारी करावी, अशी माझी सर्व गोमंतकीयांना कळकळीची विनंती आहे. माझ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा स्‍वीकारण्यासही मी उपलब्ध असणार नाही. माझ्या वाढदिवशी पोस्टर, बॅनर लावू नयेत, असेही श्री. कामत म्‍हणाले.
Goa

संबंधित बातम्या