राज्‍यात घरकामगारांची संघटनाच नाही.

Dainik Gomantak
बुधवार, 8 जानेवारी 2020

पणजी, 
घरोघरी भांडीधुणी तसेच फरशी पुसण्‍यासारखी कामे करीत असणार्‍या महिलांची ओळख घरकामगार महिला अशी आहे. राज्‍यात असणार्‍या काही खेड्यांचा भाग सोडला असता शहरी भागात प्रत्‍येक घरात एक महिला घरकामगार आहे. मात्र आजवर या महिलांच्‍या संख्‍येबाबत कोणत्‍याही प्रकारचे एकत्रीकरण झालेले नाही शिवाय या महिलांच्‍या अधिकारांसाठी, हक्‍कांसाठी काम करणारी कोणतीच संघटना नसल्‍याचे सत्‍य या महिलांशी बोलल्‍यानंतर समोर आले आहे. 

यांसंदर्भात काही घरकाम करणार्‍या महिलांशी संवाद साधला असता त्‍यांना मार्गदर्शन करणारा कोणी वालीच नसल्‍याचे समोर आले आहे. झारखंड येथील लोलीता सागंते की, पणजीतील पोलीस स्‍थानक कोठे आहे, याचीही मला माहिती नाही. तसा आजवर कधी पोलीसस्‍थानकांपर्यंत जाण्‍याचा प्रसंग आला नाही मात्र आलाच तर काय करायचे हे मला माहित नाही. अनेक घरांमध्‍ये मला आठवड्याची सुट्‍टीही दिली जात नाही, काही घरात मात्र ती आवर्जुन दिली जाते. 
एका घरात धुणीभांडी करण्‍यासाठी या महिला एक हजार रूपये घेतात, तर फरशी पुसण्‍याचे काम असेल तर हि रक्‍कम दीड हजारपर्यंत होते. एक महिला एकापेक्षा अधिक घरात काम करीत असून एका महिलेचा पगार सुमारे १५ च्‍या घरात असल्‍याची माहिती मिळाली. शिवाय या महिलांचा राहण्‍याच्‍या बाबतीतही ठावठिकाणा नाही, बर्‍याचशा महिला एकत्रितपणे भाड्याने राहतात, काहीजण झोपडपट्‍ट्यांमध्‍ये राहतात तर काहीजण ज्‍या ठिकाणी काम करतात, त्‍यांच्‍याकडील रिकाम्‍या उपलब्‍ध असणार्‍या जागेत राहतात. 

या काम करणार्‍या महिलांना त्‍यांच्‍या हक्‍काबाबत जाणीव करून देण्‍याचे काम १० वर्षांपुर्वी माझ्‍या घरात काम करणार्‍या महिलेपासून सुरू केली. आताही या महिला माझ्‍या संपर्कात आहेत, त्‍यांना एकत्रित करून त्‍यांची संघटना करण्‍याचे माझ्‍या मनात आहे आणि मी यासाठी प्रयत्‍न करणार आहे. आर्थिक पातळीवर पहायला गेले तर त्‍यांची अवस्‍था पहिल्‍यापेक्षी चांगली आहे. मात्र त्‍यांच्‍या न्‍यायासाठी, हक्‍कांसाठी आणि अधिकारांसाठी लढण्‍यासाठी संघटनेची आवश्‍‍यकता नक्‍कीच असल्‍याचे मत यावेळी या महिलांसाठी काम करणार्‍या सीमा पेडणेकर यांनी व्‍यक्‍त केले. 

संबंधित बातम्या