मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांत एकवाक्यतेचा अभाव ः आप

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामधला राजकीय संघर्ष वर्चस्व सिध्द करण्यासाठी आहे

पणजी

कोविड संकटाला राज्य तोंड देत असताना मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे दोघेही एकाच मताचे दिसत नाहीत, या साध्या कारणासाठी दोघांनी मिळून किमान एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची मागणी आम आदमी पक्षाने सातत्याने केली होती. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामधला राजकीय संघर्ष वर्चस्व सिध्द करण्यासाठी आहे व त्यांच्यात या महामारी विरुध्द लढण्यात एकोपा दिसत नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी केली आहे.
त्यांनी पत्रकात नमूद केले आहे, की करशाही, डॉक्टरांचे वैद्यकीय पथक आणि मोठ्या संख्येने लोक एकप्रकारे राज्यकारभाराचे व मुत्सुद्दीपणाचे प्रदर्शन पाहाण्यास उत्सुक होते, तेव्हा मुख्यमंत्री आणि त्यांचे आरोग्य मंत्री दोघेही राजकीय संरक्षणाच्या प्रयत्नात एकमेकांपासून सावधपणा बाळगण्याची खेळी खेळत होते. प्रामाणिकपणा दाखवण्याची संधी वापरण्याऐवजी दोघांतही गरज नसताना स्पर्धा चालल्याचे दिसत आहे. केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या इतर राज्य सरकारांनी संकटावर कशी मात केली जात आहे याची चमकदार उदाहरणे लक्षात घेऊन एक ‘मजबूत युनिट’ म्हणून सरकारची पूर्ण ताकद दाखवावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. मात्र आता दोघांतील संघर्ष लपून राहिलेला नाही. त्यांनी आपला संघर्ष थांबवाबा आणि सामान्यांसाठी महामारी विरुध्द लढावे.

संबंधित बातम्या