डिचोली नगरपालिका, पंचायतींना वीज थकबाकीची नोटीस

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

वीज खात्याच्या उपविभाग १(यु) या डिचोली क्षेत्रात येणाऱ्या सर्व भागांमध्ये जसे की डिचोली नगरपालिका, ग्रामपंचायतीचे प्रभाग जसे की मये, शिरगाव, नार्वे, पिळगाव, वन-मावळिंगे-कुडचिरे, लाटंबार्से, साळ, मेणकुरे, इब्रामपूर, अस्नोडा, अडवलपाल व मुळगाव या भागांना थकलेली वीज बिले भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे.

पणजी : डिचोली येथील नगरपालिका तसेच पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भागांमध्ये वीज खात्याच्या डिचोली येथील उपविभागीय अभियंता कार्यालयातर्फे वीज थकबाकीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटीस जारी करण्यात आल्याच्या १५ दिवसांच्या आत थकबाकी न भरली गेल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा उपविभागीय अभियंता उपविभाग १ (यु) या डिचोली येथील वीज कार्यालयाकडून नोटीशीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

नोटीस २० फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली असून थकबाकी असलेल्या सर्व भागधारकांना थकलेली वीज बिले ही नोटीस जारी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत भरण्याची विनंती या नोटीशीच्या माध्यमाने करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती देणारे पत्र माहिती खात्याच्या संचालकांना डिचोली उपविभागीय अभियंता कार्यालयातर्फे देण्यात आले असून माहिती खात्यातर्फेच उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले पत्र प्रसिद्धी माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आले आहे.

सदर वीज थकबाकीची बिले नोटीस जाहीर झाल्याच्या दिवसापासून येत्या १५ दिवसांमध्ये न भरली गेल्यास डिचोली येथील वर उल्लेख केलेल्या भागांचे वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा या नोटीस जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रामध्ये देण्यात आलेला आहे.

 

 

नवीन मल्टिप्लेक्स बांधकाम प्रस्ताव रद्द करा - दिगंबर कामत

संबंधित बातम्या