परिचारिकेचे टाळ्या वाजवून स्वागत

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

तिला पुढील दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

घाटकोपर

कोरोनावर मात करीत 17 दिवसांनंतर घरी आलेल्या परिचारिकेचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. तिला पुढील दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विक्रोळीमधील गोदरेज हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या परिचारिकेला हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिच्यावर पवई येथील हिरानंदानी रुग्णालय उपचार सुरू होते. अखेर तिने कोरोनावर मात करत 17 दिवसांनंतर विक्रोळी कन्नमवार नगर-2 मध्ये रहात असलेल्या घरी परतली. यावेळी परिसरातील रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात तिचे जोरदार स्वागत केले व घरातल्या सदस्यांनी तिची आरती ओवाळली.

संबंधित बातम्या